मुलगी हौसेनं आईला सोबत घेऊन् ‘हनीमून’ला गेली, सासूला पाहून पतीचं मन ‘भरलं’ अन् लग्नच उरकून टाकलं

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – प्रत्येक आई वडील हे आपल्या मुलीच्या संसारासाठी चांगलेच आशीर्वाद देत असतात. मात्र एका आईमुळेच मुलीचा संसार उद्धवस्त होणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. झाले असे की, मुलीने हनिमूनला जाताना आईला सोबत घेतले. मात्र जावयाने थेट सासूवरच नजर ठेऊन प्रेमसंबंध जोडले आणि दोघांनी लग्न देखील केले. लंडन येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

हनिमूनला आईला सोबत घेऊन गेलेल्या मुलीच्या नवऱ्याने आपल्या सासू सोबतच प्रेम संबंध जोडले. काही दिवसांनी पत्नीशी घटस्फोट घेऊन मुलाने थेट सासू सोबतच संसार सुरु केला. लंडनमधील ट्विकेनहम इथं राहणाऱ्या 34 वर्षीय लॉरेनने आपला प्रियकर पॉलसोबत लग्न करून खूश होती. लॉरेन आणि पॉल गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. लग्नाआधीच त्यांना एक मुलगा सुद्धा होता.

लॉरेनने सांगितलं की, लग्नानंतर आम्ही हनीमूनला गेलो होतो. तेव्हा मी माझ्या आईला सोबत फिरायला नेलं होतं. या दरम्यान पॉल आणि माझ्या आईमध्ये चांगलीच केमिस्ट्री जमली होती. दोघे ऐकमेकांच्या जवळ आले होते. परंतु, लॉरेनला दोघांवर कधीच संशय आला नाही की त्या दोघांमध्ये काही सुरू आहे.

आईने दिला पतीच्या मुलाला जन्म
पॉल आणि आईने आपापसातील प्रेम संबंध कधीच मान्य केले नव्हते मात्र नऊ महिन्यांनी आईने पॉलच्या मुलाला जन्म दिला त्यानंतर मात्र त्या दोघांनी लग्न केले असल्याची कबुली दिली. संतापलेल्या लॉरेन्स ने पॉलला अखेर सोडून दिले.

आईनेच मोडला मुलीचा संसार
ज्या आईने मला जन्म दिला तिनेच माझा विश्वासघात केला, हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट क्षण होता. माझ्याच आईने माझा संसार उद्धवस्त केला मी त्या दोघांनाही कधीच माफ करणार नाही. अशा प्रकारच्या भावना लॉरेन्सने व्यक्त केल्या आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –