प्रायव्हेट पार्टमध्ये 7 इंचाची बाटली, ‘एक्स-रे’ पाहून डॉक्टर ‘हैराण-परेशान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एका व्यक्तीला चालताना त्रास होतो म्हणून त्यांनी डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टरांना सांगितलं की, त्यांच्या कंबरेच्या खाली त्रास होत आहे. नंतर या रुग्णाचा एक्स रे काढण्यात आला. यात डॉक्टरांना जे काही दिसलं ते पाहून डॉक्टर अवाकच झाले.

त्या व्यक्तीच्या गुप्तांगात 7 इंच लांब बाटली घुसली होती. यामुळेच त्या व्यक्तीला त्रास होत होता. नंतर डॉक्टरांनी या 60 वर्षीय व्यक्तीचं ऑपरेशन करून गुप्तांगातून बाटली बाहेर काढली. यानंतर त्या रुग्णाला त्रासातून आराम मिळाला.

गुप्तांगात बाटली असल्याचा खुलासा करत रुग्णानं सांगितलं की, “एक दिवस त्याला कंबरेच्या खाली खाज आली होती. बाटलीच्या साहाय्यानं त्यानं खाजवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान बाटली गुप्तांगात गेली.

डेली मेल या इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, जी बाटली रुग्णाच्या गुप्तांगातून काढली गेली चीनमध्ये ती पारंपरिक पद्धतीनं डासांपासून वाचण्यासाठीची क्रिम किंवा खाजेवर वापरला जाणाऱ्या साबणाचं लिक्वीड ठेवण्यासाठी वापरली जाते.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/