लोणीकंद ग्रामपंचायतचे अवैद्य धंदे बंद करण्याबाबतचे लोणीकंद पोलिसांना पत्र

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या पुणे जिल्ह्यामध्ये अवैद्य धंद्याने पुन्हा डोके वर काढल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी राजरोसपणे जुगार, मटका, वेश्याव्यवसाय, दारू, गांजा यांची विक्री केली जात असून आता या विरोधात चक्क ग्रामपंचायतीने हे धंदे बंद करण्यासाठी पत्र दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीतील लोणीकंद ग्रामपंचायतच्या वतीने नुकतेच लोणीकंद चे पोलीस निरीक्षक आणि पुणे ग्रामीण पोलिस दलाचे पोलीस अधीक्षक यांना परिसरामध्ये सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी मागणी केली आहे.
Capture
या धंद्यामुळे अनेक लोकांचे, गोरगरिबांचे कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. तरी या अवैध व्यवसायावर कडक व कायदेशीर कारवाई करण्यात यावी .याबाबतचे लेखी पत्र लोणीकंद ग्रामपंचायत च्या वतीने देण्यात आले आहे .यामुळे पूर्व हवेली भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे असल्याचे निदर्शनास येत आहे. आत्तापर्यंत सामाजिक संघटना, आरटीआय, कार्यकर्ते, माहिला हेच याबाबत आवाज उठवत होते परंतु आता चक्क ग्रामपंचायतीने पत्र दिल्याने अवैध धंद्याची व्यापकता किती मोठी आहे हे दिसून येते. यामुळे असे अवैद्य व्यवसाय हे कोणामुळे फोफावतात ? हे कायमचे का बंद होत नाही ? याच्या पाठीमागे कोण आहे ?याबाबतीत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

आपल्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध, बेकायदेशीर व्यवसाय बंद सुरू आहे. छञपती संभाजी महाराजाच्या समाधी स्थळाजवळ देखील हाॕटेलवर अवैध व्यवसाय चालतो. पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे. परंतु पोलिसाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. परंतु आमच्या सारख्या कार्यकर्तेनी तक्रार केल्यावर पोलिस खात्याकडून विरोध व दबाव आणला जातो हे चुकीचे आहे. त्यामुळे माहिती सेवा समितीच्या माध्यमातून पुन्हा वरिष्ठाकडे तक्रार करणार आहोत.
– चंद्रकांत वारघडे (प्रदेश अध्यक्ष-माहीती सेवा समिती महाराष्ट्र राज्य)

Visit : Policenama.com