बांधकाम व्यावसायिकाच्या साइटवर चोरी करणाऱ्या दोघांना लोणीकंद पोलिसांनी घेतले ताब्यात

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – लोणीकंद ता. हवेली येथील सबरबिया इस्टेट बांधकाम व्यावसायिकाच्या साईट वरील गोडावूनचे कुलूप तोडून सुमारे 1 लाख 26 हजार 626 रुपये किमतीचा मुद्दे मालचोरीला गेल्या बाबत लोणीकंद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याबाबत लोणीकंद पोलिसांनी तपास करत शिवानाना जगताप (वय ४० रा सणसवाडी) आणि अविनाश किरण काळे (वय २० लोणिकंद) या दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणीकंद पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत असताना पहाटेच्या सुमारास पुणे-नगर महामार्गावर ती लोणीकंदच्या माथ्यावरती दोन्ही इसम त्यांच्या ताब्यातील काळे रंगाच्या बॅगमध्ये काहीतरी सामान संशयरित्या घेऊन जाताना दिसले .लोणीकंद पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांना ताब्यात घेउनअधिक सखोल चौकशी केली असता त्यांनी लोणीकंद येथील एका सोसायटीच्या शेडमधील पितळ धातूचे नळ सह इतर साहित्य चोरी केल्याचे साहित्य आढळून आले,

तसेच यावेळी आरोपीकडे अधिक सखोल चौकशी केली असता त्याच्या घरामध्ये तांब्या पितळेच्या पट्ट्या, वायर, विद्युत डीपीच्या लोखंडी पट्ट्यासह कुलूप तोडण्यासाठी लागणारे लोखंडी कटर, एक्स ब्लेड पंनी पाना हे साहित्य चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले तर आरोपीने लोणीकंद येथील कृषी संशोधन केंद्रातील २७ हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक ट्रांसफार्मर चोरी करून त्यातील तांब्या-पितळेची तारा चोरल्या असल्याचे निष्पन्न झाले.

तर यामधील शिवानाना जगताप हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्या वरती शिक्रापूर, पौंड येथे चोरी व घरफोड्यांच्या गुन्हा सह विद्युत डीपी चोरीचे एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. या आरोपींकडे कसून तपासणी केली असता आरोपीकडून दोन्ही गुन्ह्यातील एकूण एक लाख 53 हजार 625 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डाॕ. अभिनव देशमुख , उपविभागीय पोलीस अधिकारी डाॕ. सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या पथकाने केली आहे.