तंबाखू मागण्याच्या बहाण्याने तरुणाला लूटले

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – तंबाखू मागण्याचा बहाणा करून रस्त्याने पायी जात असलेल्या व्यक्तीला लुटल्याची घटना भोसरी येथे इंडियन ऑइल पेट्रोल पंपामागच्या मोकळ्या मैदानात घडली. भोसरी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

अजय सुखदेव माने (१९, रा. भैरव नगर, धानोरी), अविनाश पोपट दुधवडे (१९, रा. देवकर वस्ती, भोसरी), अनिल राणोजी जावळे (१८, रा. सद्गुरू नगर, भोसरी), आदर्श उर्फ कुक्या गोविंद जगताप (१८, रा. वडमुखवाडी, च-होली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा – गोमांस वाहतूक करणारा टेम्पो पकडला 

याप्रकरणी निलेश एकनाथ कानडे (३६, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी फिर्यादी निलेश त्यांचे मित्र कैलास चोरमारे यांच्या सोबत पायी चालत जात होते. त्यावेळी दोन दुचाकीवरून आरोपी आले. निलेश यांच्याकडे तंबाखू मागण्याचा बहाणा करून आरोपी थांबले. निलेश यांच्याजवळ असलेली रोख रक्कम, चांदीची अंगठी आणि कागदपत्रे असा एकूण दोन हजार ६०० रुपयांचा ऐवज आरोपींनी जबरदस्तीने चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. भोसरी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली. तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

पुण्यात घरफोडी ; सोन्या – चांदीचे दागिने, लॅपटाॅप लंपास

राहते घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातून सोन्या-चांदीचे दागिने, लॅपटॉप, दोन पेन ड्राइव्ह असा ऐवज चोरून नेला. ही घटना भोंडवे लॉन्स जवळ घडली. याप्रकरणी सोमवारी (दि. 4) देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.

या प्रकरणी तुषार विजयराव तांबे (३४, रा. साई व्हिस्टा बिल्डिंग, भोंडवे लॉन्स जवळ, रावेत) यांनी फिर्याद दिली आहे. तर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार यांचे घर कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉक तोडून कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने, लॅपटॉप, दोन पेन ड्राइव्ह असा ऐवज चोरून नेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.