Coronavirus : 14 April पर्यंत एकही पॉझिटिव्ह राहिला तर 15 एप्रिल नंतरही लॉकडाऊन सुरूच राहणार, यूपी सरकारचा निर्णय

लखनऊ : वृत्तसस्था – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा म्हणजेच 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. तबलिगी जमातमध्ये उपस्थित राहिलेले लोक परतल्यानंतर 159 जणांना कोरोनाची लागण झाली. तबलिगी जमातमधील लोकांमुळे कोरोनाचा फैलाव झाला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार 14 एप्रिलनंतर देखील लॉकडाऊन हटवण्याच्या स्थितीत नाही. सध्या उत्तर प्रदेशात 305 जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत, त्यापैकी निम्म्याहून अधिक लोक हे तबलिगी जमातमधून परतलेले आहेत.
उत्तर प्रदेशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने योगी अदित्यनाथ सरकार 14 एप्रिल नंतर देखील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची शक्यता आहे.

अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांनी तसे संकेत आज (सोमवारी) दिले आहेत. अवनीश अवस्थी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, तबलिगी जमातमध्ये सहभागी झालेल्या लोकांना कोरनाची लागण झाल्याची पुष्टी होत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. हे असेच सुरु राहिल्यास 14 एप्रिल नंतर लॉकडाऊन हटवणे शक्य होणार नाही. तबलिगी संबंधित लोकांमुळेच अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. सर्वात जास्त संसर्ग आग्रा जिल्ह्यामध्ये झाला आहे. त्यानंतर मेरठ, सहारनपूर, आजमगड, लखनऊ, बाराबंकी, शामली, गाझियाबाद इत्यादी जिल्ह्यात संसर्ग झाला आहे.

अवनीश अवस्थी यांनी पुढे सांगितले की, चार वाजेपर्यंत राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 305 झाली आहे. त्यापैकी मरकझ येथे झालेल्या कार्यक्रमात सहभागी झालेले 159 लोक आहेत. तबलिगी जमातशी संबंधित लोकांमध्य कोरोनाची पुष्टी ज्या प्रकारे केली जात आहे. त्यानुसार 14 एप्रिल नंतर लॉकडाऊन हटविणे शक्य होणार नाही. सध्या तबलिगी जमातच्या लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (सोमवार) त्यांच्या सरकारी निवासस्थानी कोअर टीमबरोबर बैठक घेतली. या बैठकीत तबलिगी जमातमधून परत आलेल्या लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत असल्याने 15 एप्रिलला लॉकडाऊन हटवण्याबाबत वेट अ‍ॅड वॉचची भूमिका घेण्यात आली. अतिरिक्त मुख्य सचिव गृह व माहिती अवनीशकुमार अवस्थी यांनी सांगितले की, यापुढे तबलिगी जमातीचा एकही व्यक्ती सापडला तर त्याची पहिल्यांदा कोरोना चाचणी घेण्यात येईल.

परिस्थिती सध्या नाजूक आहे. जर एक जरी कोरोना संक्रमीत व्यक्ती राहिला तर आत्तापर्यंत केलेल्या प्रयत्नांवर पाणी फिरेल. या कारणामुळे लॉकडाऊन कालावधी अजूनही राज्यात वाढवला जाऊ शकतो. 14 एप्रिल नंतर लॉकडाऊन हटवला जाईल की नाही हे सांगता येणे अवघड आहे. कधी हटवला जाईल याचा निर्णय झाला नाही. त्यामुळे 15 एप्रिल पासून लॉकडाऊन हटवला जाईल याचा निर्णय झालेला नाही. सध्या उत्तर प्रेदशातील 32 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. प्रशासनाने सध्या त्यांच्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.