UP Rajya Sabha : भाजपाने राज्यसभेच्या 8 जागांवर मारली बाजी, BSP आणि सपाला 1-1 वर मिळाला विजय

लखनऊ : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशातून भारतीय जनता पार्टीचे आठ, तर समाजवादी पार्टी आणि बसपाचे एक-एक उमेदवार बिनविरोध राज्यसभेवर गेले आहेत. भाजपाकडून केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, भाजपा राष्ट्रीय महामंत्री अरुण सिंह, पूर्व डीजीपी ब्रिज लाल, नीरज शेखर, हरिद्वार दूबे, गीता शाक्य, बी. एल. वर्मा आणि सीमा द्विवेदी यांना राज्यसभेत जाण्याची संधी मिळाली आहे. तर समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय महासचिव रामगोपाळ यादव आणि बसपा उमेदवार रामजी गौतम बिनविरोध राज्यसभा खासदार म्हणून निवडले गेले आहेत.

समाजवादी पार्टीने संख्याबळ लक्षात घेऊन आपले वरिष्ठ नेते प्रोफेसर रामगोपाळ यादव यांना उमेदवार केले आहे आणि एक अपक्ष उमेदवार प्रकाश बजाज यांना समर्थन दिले आहे. मात्र, पीएम नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदार संघात राहाणारे बजाज यांचा अर्ज नाकारला गेला.

बिनविरोध निवड घोषित झालेल्या सदस्यांना निवडणूक निर्णय अधिकारी मोहम्मद मुशाहिद सईद यांनी त्यांची प्रमाणपत्र सोपवली. भाजपाकडून निवडूण आलेले सदस्य बृजलाल यांनी सांगितले की, त्या सर्वांचा कार्यकाळ 25 नोव्हेंबर 2020 पासून 24 नोव्हेंबर 2026 पर्यंत राहील. दहा जागांसाठी एकुण 11 उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली होती. तर अपक्ष उमेदवार प्रकाश बजाज यांनी समाजवादी पार्टीच्या समर्थनाखाली उमेदवारी दाखल केली होती, परंतु तांत्रिक त्रूटीमुळे त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला.

राज्यसभेत उत्तर प्रदेशच्या कोट्यातून 31 जागा आहेत. यामध्ये आता सर्वाधिक 22 जागा भाजपाच्या होतील. तर समाजवादी पार्टीकडे पाच आणि बसपाच्या खात्यात तीन जागा राहतील. काँग्रेसकडे आता उत्तर प्रदेशमधून राज्यसभेसाठी केवळ एक जागा राहील.

भाजपाने उतरवले होते 8 उमेदवार

राज्यसभेच्या 10 खासदारांचा कार्यकाळ 25 नोव्हेंबरला पूर्ण होत आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे तीन, समाजवादी पार्टीचे चार, बसपाचे दोन आणि काँग्रेसच्या एका जागेचा समावेश आहे. मात्र, राज्यसभा निवडणुकीत भाजपा युपीमध्ये नऊ उमेदवार उतरवून विजय मिळवण्याच्या स्थितीत होती. परंतु, त्यांनी केवळ आठ उमेदवार उतरवत एक जागा रिकामी सोडली होती. इतकेच नाही, भाजपाच्या या डावानंतर सर्वांना आश्चर्यचकित केले होते. तर काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने बसपावर भाजपासोबत आघाडीचा आरोप केला होता.

राज्यसभेचे बदलले गणित

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या राज्यसभेच्या 11 जागांच्या आलेल्या निकालाने भाजपा राज्यसभेत आतापर्यंतच्या उच्च स्तरावर आहे. याशिवाय काँग्रेसच्या जागा इतिहासात सर्वात कमी झाल्या आहेत. सध्या राज्यसभेत भाजपाचे 92 खासदार आहेत. तर काँग्रेस 38 वर राहिली आहे. एनडीएबाबत बोलायचे तर त्यांच्याकडे आता 112 खासदार आहेत, परंतु आता तिथे बहुमताच्या संख्येपासून दहा जागा दूर आहे. राज्यसभेत एकुण जागा 245 आहेत ज्यामध्ये 12 जागांवर राष्ट्रपती सदस्यांना निवडतात. तर, अन्य जागांसाठी निवडणूक होते.