लोकसभेला ‘हिट’ झालेल्या पिवळ्या साडीतील ‘त्या’ पोलिंग अधिकार्‍याच्या मतदान केंद्रावर ‘तोबा’ गर्दी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2019 च्या लोकसभेच्या वेळी एका पिवळ्या साडीतील महिलेचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. ही महिला एका ठिकाणी पोलींग बूथचे काम पाहण्यासाठी आली होती मात्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर या महिलेचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर मीडियानेही या महिलेबाबत अनेक प्रकारची माहिती दिली होती. रीना द्विवेदी नावाची ही महिला लखनऊच्या बांधकाम विभागात कार्यरत असल्याची माहिती समोर आली होती

रीना द्विवेदी यांच्या बुधवर लाईन
यावेळी देखील रीना द्विवेदी लखनऊ येथे होत असलेल्या विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी काम पाहत आहे. त्यांची ड्युटी कृष्णा नगर येथील एका कॉलेजमध्ये होती. यावेळी रीना यांच्या मतदान केंद्रावर मतदारांच्या लाईनी लागल्याचे चित्र पहायला मिळाले. बाकी पोलींग बुथवर मात्र शुकशुकाट होता. यावेळी रीना द्विवेदी यांनी सांगितले की या बुधवर एक हजार मतदान आहे आणि दुपारपर्यंत 300 लोकांनी मतदान केल्याचे समजते.

लोकांनी घेतला सेल्फी
या आधी रविवारी सकाळी जेव्हा रीना पोलींग बुधवर ईव्हीएम किट घेण्यासाठी पोहचल्या होत्या यावेळी लोकांनी त्यांच्यासोबत सेल्फी देखील घेतला. यावेळी रीना यांनी सांगितले की मी आधीपासून फॅशनला फॉलो करते, मागच्या निवडणुकीच्या वेळी माझे पिवळ्या साडीतील फोटो व्हायरल झाले आणि सगळे मला पिवळ्या साडीवाली मॅडम म्हणून ओळखू लागले.

फॅशन प्रेमी असूनही रीना या बांधकाम विभागात कार्यरत आहेत तसेच त्यांना आपली सामाजिक बांधिलकी माहित असल्याने त्यांनी या पोट निवडणुकीमध्ये सर्वांना मतदान करण्याचे अवाहन देखील केले आहे.

 

Visit  :Policenama.com