आंतरराष्ट्रीय हिंदू महासभेचे अध्यक्ष रंजीत बच्चन हत्याकांडाचा ‘पर्दाफाश’, दुसर्‍या पत्नीनं मित्रासह रचला होता कट

लखनऊ : वृत्तसंस्था – शेवटी पोलिसांनी विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रंजीत बच्चन यांच्या हत्येचा खुलासा केला आहे. या हत्येच्या कटामागे अन्य कुणाचा हात नसून रंजीत यांची दुसरी पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. स्मृती ही रंजीत यांची दुसरी पत्नी आहे. त्या दोघांमध्ये घटस्फोटाचे प्रकरण निकाली निघत नव्हते. स्मृती यामुळे खुप अस्वस्थ होती. याच दरम्यान तिने आपल्या मित्राच्या मदतीने एक भयंकर कट रचला.

लखनऊ पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा करताना म्हटले की, रंजीत बच्चन यांची दुसरी पत्नी स्मृती त्यांच्यामुळे अस्वस्थ होती. दोघे वेगळे झाले होते. परंतु त्यांची घटस्फोटाची केस कोर्टात असूनही मार्गी लागत नव्हती. कारण स्मृतीला दुसर्‍या व्यक्तीशी लग्न करायचे होते. परंतु, केस मार्गी लागत नसल्याने ती लग्न करू शकत नव्हती. तेव्हा तिने हा भयंकर कट रचला.

तिने रंजीत यांना वाटेतून बाजूला करण्याचे ठरवले. याकामात तिने आपल्या एका मित्राची मदत घेतली. आणि याच कटाप्रमाणे 1 फेब्रुवारीला बाईकवरून आलेल्या मारेकर्‍यांनी लखनऊ हजरतगंत परिसरात ग्लोबल पार्कजवळ रंजीत बच्चन यांची गोळ्या मारून हत्या केली. तेव्हापासून ही केस पोलिसांसाठी एक आव्हान झाली होती. पोलिसांच्या अनेक टीम या प्रकारणाचा तपास करत होत्या.

पोलिसांनी हत्येचा तपास लावण्यासाठी 70 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज तपासले. तेव्हा समजले की, या हत्याकांडामध्ये स्मृतीचा मित्र सहभागी होता. सध्या पोलीसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.

काय आहे प्रकरण
रंजीत बच्चन यांना 1 फेब्रुवारीला बाईकवरून आलेल्या मारेकर्‍यांनी गोळ्या घातल्या होत्या. घटना हजरतगंज परिसरातील ग्लोबल पार्कजवळ घडली होती. फायरिंगनंतर मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले होते. बच्चन यांना ताबडतोब लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषीत करण्यात आले. त्यांचा लहान भाऊ आदित्य, यालाही घटनास्थळावर गोळी लागली होती. हत्येनंतर पीआरव्ही पोलीस कर्मचारी, एक कॉन्स्टेबल आणि चौकी प्रमुख यांच्यासह चार पोलीस अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले होते. पोलिसांनी हत्येतील संशयीत आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा जारी केले होते. तसेच आरोपींची माहिती देणार्‍यास 50000 हजाराचे बक्षीस जाहीर केले होते.