दिवाळीपुर्वी 2 मजुरांचं नशीबच उघडलं, खोदकाम करताना सापडलं ‘घबाड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  मध्यप्रदेशातील दोन मजुरांचे दिवाळीआधी नशीब फळफळले आहे. पन्ना जिल्ह्यातील या मजुरांना येथील जगप्रसिद्ध हिऱ्याच्या खाणीत दोन मजुरांना दोन मौल्यवान हिरे सापडले आहेत. डायमंड निरीक्षक अनुपम सिंह यांनी मंगळवारी सांगितले, की सोमवारी दोन कामगारांनी कार्यालयात दोन हिरे जमा केले. दिलीप मिस्त्री यांना कृष्णा कल्याणपूर भागातील जुरापूर खाणीतून ७.४४ कॅरेटचा हिरा मिळाला आहे, तर लखन यादव यांना १४.९८ कॅरेटचा हिरा मिळाला आहे.

याविषयी अधिक माहिती देताना सिंह यांनी सांगितले, की या हिऱ्यांमुळे दिवाळीआधी दोन मजुरांचं नशीब उघडले ! खोदकाम करताना मिळालेले २ मौल्यवान हिरे जाणार आहे. अंदाजानुसार ७.४४ कॅरेटच्या हिऱ्याची किंमत सुमारे ३० लाख रुपये असू शकते तर १४.९८ कॅरेटच्या हिऱ्याची किंमत त्यापेक्षा दुप्पट असू शकतो. या दोन्ही हिऱ्यांचा लिलाव होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर १२.५ टक्के रॉयल्टी वजा केल्यानंतर उर्वरित रक्कम या दोन कामगारांना देण्यात येणार आहे.

दिवाळीआधी बदललं नशीब

यामधील एक हिरा सापडलेले लखन यादव म्हणाले, “आम्ही आनंदी आहोत. मला प्रथमच हिरा मिळाला. ही देवाची देणगी आहे. मी एक छोटा शेतकरी आहे आणि माझ्याकडे दोन एकर जमीन आहे. डायमंड लिलावानंतर मिळालेल्या पैशांचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी करणार आहे. .तर दिलीप मिस्त्री म्हणाले,“ देवाच्या कृपेने मला प्रथमच हा दर्जेदार हिरा मिळाला आहे. या हिऱ्याच्या विक्रीतून मिळालेल्या पैशातून माझ्या मुलांचे भविष्य उज्वल होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, याआधी मागील महिन्यात पन्ना खाणींमध्ये एका मजुराला एकाच वेळी तीन हिरे मिळाले होते. हे हिरे ४.४३, २.१६ आणि ०.९३ कॅरेटचे होते. त्यांची अंदाजित किंमत अंदाजे ३० लाख इतकी होती. त्यामुळे या दोन कामगारांना देखील या हिऱ्यांमुळे मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.