मध्य प्रदेशात सरकार बनण्याच्या हालचालींनंतर दिसला भाजपामध्ये अतंर्गत ‘कलह’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशमधील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या राज्य संघटनेनेही नाट्यमय वळण घेतले आहे. माहितीनुसार आमदार नरोत्तम मिश्रा आणि माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यात वाद निर्माण झाला आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत आमदार नरोत्तम मिश्रा आणि माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यातील मतभेद स्पष्ट दिसत होते. मंगळवारी भोपाळ येथे झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नरोत्तम मिश्रा यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली आणि चौहान यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले गेले. मंगळवारी भाजपची बैठक होत असताना काही भाजप कार्यकर्त्यांनी राजकारणातील शिवराज यांचे ज्युनियर नरोत्तम मिश्रा यांच्या बाजूने घोषणाबाजी केली. यानंतर मध्य प्रदेशात राजकीय चर्चेला उधाण आले.

भाजपने मोहिमेला नाव दिले ‘रंगपंचमी’ !
मध्य प्रदेश सरकारमधील संकटाच्या मुद्द्यावर मिश्रा आणि चौहान दोघांनीही सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही भूमिकेवर वारंवार नकार देत म्हटले कि, ही काॅंग्रेसची अंतर्गत समस्या आहे. मध्य प्रदेश सरकार अस्थिर करण्यात नरोत्तम मिश्रा आणि शिवराजसिंह चौहान यांचा सहभाग असल्याचे समजते. माहितीनुसार भाजपने या मोहिमेला ‘रंगपंचमी’ असे नाव दिले कारण सरकार होळीला पडावे अशी त्यांची इच्छा होती.

काॅंग्रेस नेते दिग्विजय सिंह म्हणाले होते की, ‘मी शिवराजसिंह चौहान आणि नरोत्तम मिश्रा यांच्यावर कधीही आरोप केलेला नाही. परंतु मुख्यमंत्री कोण असतील यावर वाद झालेला नाही. आता हे निश्चित झाले आहे कि, एक मुख्यमंत्री, दुसरा उपमुख्यमंत्री असेल. दरम्यान, मिश्रा, शिवराज सिंह यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते, ते दतियाचे आमदार आहेत. 1990 मध्ये त्यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका जिंकली. मिश्रा बाबूलाल गौर यांच्या मंत्रिमंडळातही मंत्री राहिले आहेत.

काय आहे समीकरण ?
दरम्यान, 228 आमदारांच्या विधानसभेत काॅंग्रेसला 114 आमदारांसह इतर 7 जणांचा पाठिंबा आहे, त्यात त्यांच्याजवळ 121 आमदार आहेत. दुसरीकडे, जर या 22 राजीनामा देणाऱ्या आमदारांच्या संख्येला विधानसभेच्या एकूण जागांमधून कमी केल्यास ती 206 होईल. अशा परिस्थितीत बहुमतासाठी 104 जागांची आवश्यकता भासणार आहे.