मध्य प्रदेश सत्ता संघर्ष : गांधींना मारण्यासाठी गोडसेला ग्वाल्हेरमधूनच मिळाली होती पिस्तूल

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – मध्य प्रदेशात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर आता काँग्रेस नेते देखील ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह भाजपवर हल्लाबोल करत आहेत. यात आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर निशाणा साधला. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की महात्मा गांधींना मारण्यासाठी नथुराम गोडसेने ज्या पिस्तुलाचा वापर केला होता, ते पिस्तुल ग्वालियरच्या परचुरेने उपलब्ध करुन दिले होते. या ट्विटमध्ये थेट शिंदे याचा उल्लेख तर करण्यात आलेला नाही मात्र शिंदे यांच्यावरच हा हल्लाबोल होता असे मानले जात आहे. कारण ते ग्वालियर राजघराण्याशी संबंधित आहेत.

भाजपात प्रवेश करणाऱ्या शिंदे यांनी दिग्विजय सिंह यांनी दिल्या शुभेच्छा –
याआधी दिग्विजय सिंह यांनी उपहासात्मक स्वरुपात ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपात जात असल्याने शुभेच्छा दिल्या. सिंह यांनी ट्विट केले की, मला वाटते की शिंदे यांनी अमित शाह किंवा निर्मला सीतारमन यांची जागा घेतली पाहिजे. मला त्यांच्या प्रतिभेबाबत माहित आहे, ते निश्चितच चांगले काम करतील. कदाचित ते मोदी – शाहांच्या संरक्षणासाठी देखील पुढे येतील. तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा महाराज.

कोण आहे परचुरे –
आपल्या ट्विटमध्ये दिग्विजय सिंह यांनी जो परचुरे नावाचा उल्लेख केला, त्यांंचे पूर्ण नाव डीएस. परचुरे होते. ते ग्वालियरच्या एका हिंदू संघटनेचे प्रमुख होते. सांगण्यात येते की डॉ. परचुरे यांनी आपल्या एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून पिस्तुलचा सौदा नथुराम गोडसे याच्याशी 500 रुपयात केला होता. यानंतर गोडसेने स्वर्ण रेखा नदीच्या किनारी दहा दिवस फायरिंगचा सराव केला. हातात पिस्तुल बसल्यानंतर तो महात्मा गांधींच्या हत्येसाठी दिल्लीला रवाना झाला होता.

या दरम्यान शिंदे राजघराणे असताना पिस्तुल खरेदी करण्यासाठी परवान्याची आवश्यकता नव्हती. यामुळे गोडसेने पिस्तुल खरेदी करण्यासाठी ग्वालियरची निवड केली होती.

ग्वालियर राजघराण्याचे आहेत शिंदे –
ज्योतिरादित्य शिंदे हे मध्यप्रदेशच्या प्रतिष्ठित ग्वालियर राजघराण्यातील आहेत. ग्वालियार राजघराण्यातील राजमाता विजयाराजे शिंदे यांनी 1957 मध्ये काँग्रेसमधून आपल्या राजकीय जीवनात सुरुवात केली. त्या गुना लोकसभा मतदार संघातून खासदार झाल्या. फक्त 10 वर्षात त्यांनी काँग्रेसला रामराम करत 1967 मध्ये जनसंघात प्रवेश केला. त्यांच्या या राजकीय कृतीमुळे जनसंघचा ग्वालियारमध्ये प्रभाव वाढला. 1971 साली इंदिरा गांधी यांची लाट असताना देखील जनसंघ तीन जागांवर विजय मिळवण्यात यशस्वी ठरला. स्वत: विजया शिंदे भिंडमधून, अटल बिहारी वाजपेयी ग्वालियरमधून आणि विजया राजे शिंदे यांचे पुत्र आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचे वडील माधवराव शिंदे हे गुना चे खासदार झाले.

वडीलांच्या मृत्यूनंतर ज्योतिरादित्य सक्रिय –
2001 मध्ये माधवराव शिंदे यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसमधील मजबूत नेते बनले. गुनाच्या पोटनिवडणूकीत ते खासदार झाले. 2002 नंतर ते कधीही निवडणूकीत हारले नाहीत. परंतु 2019 मध्ये लोकसभा निवडणूकीत त्यांचा मोठा पराभव झाला. कृष्ण पाल सिंंह यादव यांनी त्यांचा पराभव केला. यानंतर आता ज्योतिरादित्य शिंदे यांनी 10 मार्च 2020 मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला.