महाभारत : 55 लोकांनी दिल्या होत्या ‘स्क्रीन टेस्ट’, नितीश भारद्वाजला ‘असा’ मिळाला ‘कृष्णा’चा रोल !

पोलिसनामा ऑनलाइन –बी आर चोपडा यांचा महाभारत(1988) हा शो खूप गाजला. सध्या याचं रिपीट टेलीकास्ट दूरदर्शनवरही सुरू आहे. या मालिकेत नितीश भारद्वाज यांनी कृष्णाची भूमिका साकारली आहे. तुम्हाला या रोल मागील स्टोरी क्वचितच माहिती असेल. ती आपण आज जाणून घेणार आहोत.

रिपोर्टनुसार कृष्णाच्या रोलसाठी 55 स्क्रीन टेस्ट झाल्या होत्या. परंतु रवी चोपडा (बीआर चोपडा चा मुलगा आणि शोचे डायरेक्टर) यांना नितीशची स्माईल कृष्णाच्या रोलसाठी आवडली होती.

एका मुलाखतीत नितीशनं सांगितलं की, “आधी मला विदुराच्या रोलसाठी कास्ट करण्यात आलं होतं. परंतु नंतर अचानक माझ्या जाग्यावर कोणी दुसराच विदुर आला. मी रवीला ओळखत होतो. आम्ही सोबत सिनेमेही केले होते. मी रवीला विचारलं तर तो म्हणाला, तू आता 23-24 वर्षांचा आहे. काही एपिसोडनंतर विदुर म्हातारा होईल. हे तुला चांगलं नाही वाटणार. यानंतर माझ्याकडे कोणताच जॉब नव्हता.”

पुढे नितीशनं सांगितलं, “काही दिवसानं मला पुन्हा ऑफर आली शोमध्ये मला नकुल आणि सहदेवचा रोल दिला जात होता. मी नकार दिला. मला अभिमन्यूचा रोल करायचा होता. मी रवीला बोललो तर तो बोलला विचार करू. काही दिवसानं मला कृष्णाच्या रोलसाठी स्क्रिन टेस्टसाठी बोलावण्यात आलं. परंतु मी त्यांना हे सांगत नकार दिला की, या रोलसाठी तुम्हाला अनुभवी माणसाची गरज आहे. एका नव्या माणसाला महानायकचा रोल कसा देऊ शकता. ते म्हणाले तुला चांगला रोल करायचा होता ना. तर एकदा स्क्रिन टेस्ट देऊन तर बघ. नंतर मी स्क्रिन टेस्ट दिली आणि फायनल झालो.”