दुर्देवी ! राज्यात गणपती विसर्जनादरम्यान 17 जणांचा बुडून मृत्यू !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी(गुरुवार दि 12 सप्टेंबर) गणेश विसर्जनादरम्यान 17 लोकांचा पाण्यात बुडून मृ्त्यू झाला आहे. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकरच या गजरात बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं. परंतु अनेक ठिकाणी लोकांच्या पाण्यात बुडाल्याच्या आणि बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या.

पोलिसांनी सांगितले की, विसर्जनादरम्यान कोकणात 5 विदर्भात 6, भंडारामध्ये 1, वर्धा 1, श्रीरामपूर 1 कराड आणि नांदेडमध्ये 1 इत्यादी लोकांचा बुडून मृत्यू झाला. याशिवाय विसर्जनाला गेलेले इतर 6 लोक बेपत्ता झाले, तेही बुडाले असावेत असा संशय आहे. सप्टेंबर रोजी सुरू झालेला गणेशोत्सव काल संपन्न झाला.

मुंबई महानगर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी पुण्यात विविध मंडळांनी आणि भागातील लोकांनी ढोल ताशा पथकाचे आयोजन केले होते. भाविकांचे लक्ष वेधून घेणारे त्यांचे प्रदर्शन दरवर्षी पाहायला मिळते. मुंबई शहरात 50000 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात केले होते. 5000 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते.

दिल्लीत विसर्जनाच्या दिवशी अनेकजण बुडाले

उत्तर पूर्व दिल्लीच्या पल्ला बख्तावरपूर गावाच्या बृहस्पतिवारला गणेश विसर्जनादरम्यान काही बुडाल्याचा संशय आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना या घटनेची माहिती रात्री 8 वाजून 58 मिनिटांनी मिळाली. घटनास्थळी अग्निशमन दलाची गाडी पाठवण्यात आली असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

आरोग्यविषयक वृत्त –