विधानसभा 2019 : ‘पक्ष’ असो की ‘कुटूंब’, राजकीय कारर्किदीत शरद पवारांसाठी ‘हा’ काळ सर्वात कठीण !

ADV

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन – सोमवारी महाराष्ट्रातील विधानसभेचे मतदान पूर्ण होताच एग्जिट पोल यायला सुरुवात झाली ज्यानुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा सेना भाजप युतीचे सरकार येणार असल्याचे सुनिश्चित झाले आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे कारण मोठा फटका या विधानसभा निकालानंतर आघाडीला बसणार असे दिसते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गेल्या पंधरा वर्षांपासून राज्यात सत्तेत होती मात्र मागील पाच वर्षात विरोधात गेलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसची हालत अत्यंत दयनीय झालेली आहे आणि एग्जिट पोलच्या आकडेवारीनुसार आघाडीला मोठा फटका या ठिकाणी बसणार आहे. एग्जिट पोल नुसार आघाडीला 72 – 90 पर्यंतच जागा मिळणार आहेत.

ADV

काँग्रेसने यावेळी प्रचारादरम्यानच तलवार म्यान केली होती मात्र राष्ट्रवादीने ने शरद पवारांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार सभा गाजवल्या होत्या. त्यामुळे शरद पवार स्वतः मैदानात उतरल्यामुळे ही लढाई आता पवारांच्या प्रतिष्ठेची झालेली आहे.

एकेकाळी महाराष्ट्रात किंगमेकर होते पवार
शरद पवारांनी अनेकदा केंद्राच्या राजकारणात महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे. शरद पवारांनी मुख्यमंत्री म्हणून चार वेळा महाराष्ट्राचे नेतृत्व केलेले आहे. मात्र आज राष्ट्रवादीची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. जागांचे अर्थशातकही त्यांना पार करता येणार नसल्याचे पोलच्या आकडेवारीवरून दिसून येते. 40 ते 50 जागांवर राष्ट्रवादीला यश मिळेल असे दिसून येत आहे.

पक्षात एकटे पडले शरद पवार
शरद पवार एकटेच मैदानात उतरून पार्टीचा जोरदार प्रचार करत होते. तसेच मी अजून म्हातारा झालेलो नाही तर मनाने तरुण आहे असे देखील प्रचारा दरम्यान पवार म्हणाले होते. ईडी कडून मिळालेल्या नोटिसीमुळे आवारांबाबत एक भावनिक वातावरण तयार झाले होते मात्र त्याचे कितपत मतांमध्ये रूपांतर होईल याची खात्री देणं अवघड आहे. तसेच अनेक आजी माजी आमदारांनी पक्षाला राम राम ठोकल्याने यावेळी शरद पवार एकटेच खिंड लढवताना पहायला मिळाले.

पवार परिवारातील पुढील पिढी राजकारणात
अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी लोकससभेला मावळ मधून निवडणूक लढवली मात्र त्यांचा पराभव झाला. त्यानंतर आता शरद पवारांचे नातू रोहित पवार हे देखील कर्जत जामखेड मैदानातून विधानसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत. तसेच सुप्रिया सुळे लोकसभेमध्ये खासदार आहेत तर अजित पवार बारामती मतदार संघातून विधानसभेच्या रिंगणात आहेत.

Visit : Policenama.com