Exit Poll : पश्चिम महाराष्ट्रात भाजप – शिवसेनेची ‘सरशी’, काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा ‘फटका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर एक्झीट पोलचे आकडे जाहीर झाले आहेत. मतदारांनी कोणाच्या पारड्यात बहुमत टाकले हे आता 24 ऑक्टोबरला समजणार आहे. दरम्यान मतदानोत्तर चाचणीत महायुतीला बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात 288 जागा असून स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला फक्त 55 ते 81 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर शिवसेना-भाजप युतीला 192 ते 216 जागा मिळतील असं एक्झीट पोलचा निकाल सांगतो.

लोकसभेत ज्या पद्धतीनी भाजपने मुसंडी मारली त्याचप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीत देखील भाजप मुसंडी मारताना दिसत आहे. मागील निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला शंभरी गाठता आली नव्हती. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना-भाजपला 2014 च्या तुलनेत 11 जागा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. यावेळी युतीला 43 तर आघाडीला 23 जागा मिळतील असं एक्झिट पोलमध्ये दिसत आहे.

एक्झिट पोलननुसार पश्चिम महाराष्ट्रात 27 जागा भाजपला तर 16 जागा शिवसेनेला मिळतील. तर आघाडीच्या जागा कमी होण्याची चिन्हे असून काँग्रेसला 7 तर राष्ट्रवादीला 15 आणि इतर एक उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात एकूण 66 जागा असून 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेला 12, भाजप 22, राष्ट्रवादी 18, काँग्रेस 10 तर रासप, शेकाप, एमएनएस आणि अपक्ष यांना प्रत्येकी एक जागा जिंकली होती. 2014 मध्ये भाजप-शिवसेने स्वबळावर निवडणूक लढवली होती.

2014 चे पक्षीय बलाबल –

एकूण जागा – 288
भाजप – 122
शिवसेना – 63
काँग्रेस – 42
राष्ट्रवादी – 41

Visit  :Policenama.com