राष्ट्रवादीला आणखी एक जबर धक्का ! ‘या’ माजी खासदाराचा भाजप प्रवेश निश्चित

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यामधील विरोधी पक्षातील अनेक आजी माजी आमदार पदाधिकारी सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती काही थांबायचे नाव घेत नाहीये. कोल्हापूरचे धनंजय महाडिक हे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत मात्र भाजपमध्ये त्यांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे.

महाडिक हे राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे माजी खासदार आहेत. २०१९ च्या लोकसभेत देशातील मोदी लाट आणि काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी विरोधात केलेलं काम यामुळे महाडिकांना मोठा पराभव सहन करावा लागला. धनंजय महाडिक सध्या मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यातच आता कोल्हापूरमधील ताकदवान नेता सोडून जात असल्याने राष्ट्रवादीला चांगलाच धक्का बसणार आहे.

धनंजय महाडिक यांनी आतापर्यंत 2 वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. महाडिक यांनी मे महिन्याच्या अखेरीस भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट घेतली होती. तेव्हाच धनंजय महाडिक भाजपच्या वाटेवर असल्याची शक्यता निर्माण झाली होती.मी साखर कारखान्या संधर्भात बोलण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो असल्याचे महाडिक यांनी सांगत सर्व आरोप फेटाळले होते आता मात्र महाडिक हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार

बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार

द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ

शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे

गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!

गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या

कोणत्‍या आजारांपासून वाचण्‍यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्‍या

Loading...
You might also like