विधानसभेसाठी PM मोदींनी CM फडणवीसांना दिल्या ‘या’ सूचना, शिवसेनेची डोकेदुखी वाढणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीतही बाजी मारण्यासाठी भाजप-शिवसेना युतीचे प्रयत्न सुरू आहेत. ‘शिवसेनेसोबत युती करा, तडजोड नाही,’ अशा सूचना पंतप्रधान मोदींनी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. त्यामुळे जागावाटपात भाजपने अधिक जागांवर हक्क सांगितल्यास शिवसेनेची डोकेदुखी वाढणार आहे.
मोदींनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिल्या 'या' सूचना, शिवसेनेचं टेन्शन वाढणार
महायुती विरुद्ध महाआघाडी असा सामना रंगणार की सर्व पक्ष स्वबळाची वाट निवडणार ?
सध्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. काही दिवसांतच निवडणूक आचारसहिंता लागेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अशातच निवडणुकीत महायुती विरुद्ध महाआघाडी असा सामना रंगणार की मागील निवडणुकीप्रमाणे सर्व पक्ष स्वबळाची वाट निवडणार, याची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जागावाटपात शिवसेनेला शह देण्यासाठी रणनिती आखण्यास सुरु केली आहे. तसेच राजकीय वर्तुळातील काही घडामोडींमुळे युती होणार की नाही, याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.

शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपची पडद्यामागून रणनिती
विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात शिवसेनेला जेमतेम 100 ते 115 जागा देऊन इतर जागा भाजप आणि मित्रपक्षांच्या पदरात अलगद पडतील अशी रणनिती तर भाजपने आखली आहेच. तर लोकसभा निवडणुकांच्या वेळी विधानसभा निवडणुकीत निम्म्या-निम्म्या जागा वाटून घेण्याबाबतचे सूत्र ठरले असून शिवसेना यावरच ठाम आहे. एवढ्या कमी जागा घ्यायला शिवसेना तयार न झाल्यास विधानसभेच्या सर्व जागा शिवसेनेशिवाय लढविण्यासाठी भाजपने मित्रपक्षांशी बोलणीही सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात युतीत संघर्ष होण्याची शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त