काँग्रेसला मोठा धक्‍का ! विधानसभा निवडणूकीपुर्वीच माजी मंत्र्यासह ‘हे’ 6 आमदार सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणूका होण्यापुर्वीच काँग्रेसला मोठा धक्‍का बसला आहे. काँग्रेसच्या 6 विद्यमान आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सहाही आमदार सोमवारी भाजपचे सदस्यत्व घेणार आहेत.

राज्यात सध्या विधानसभा निवडणूकीसाठी इच्छुकांनी अर्ज भरण्यास सुरवात केली आहे. राज्यात विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदार होणार आहे तर 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गरवारे क्लब येथे होणार्‍या कार्यक्रमात काँग्रेसचे 6 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

भाजपमध्ये प्रवेश करणार्‍या 6 आमदारांची नावे पुढील प्रमाणे
1. असलम शेख (मलाड – मुंबई)
2. राहुल बोन्द्रे (चिखली – बुलढाणा)
3. काशीराम पावरा (शिरपुर – धुळे)
4. डी.एस. अहिरे (साक्री – धुळे)
5. माजी मंत्री सिध्दराम म्हेत्रे (अक्‍कलकोट – सोलापूर)
6. भारत भालके (पंढरपूर – सोलापूर)

काँग्रसेने आज (रविवारी) विधानसभेच्या 51 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये यांची नावे नसल्याने हे 6 आमदार नाराजी आहेत. दरम्यान, या 6 आमदारांनी यापुर्वीच काँग्रेस सोडण्याचे ठरवले होते. म्हणूनच त्यांना काँग्रेसने तिकीट दिले नसावे अशी चर्चा देखील आहे.

Visit : Policenama.com