राज्यातील ‘या’ मतदार संघात रक्ताच्या नात्यांमध्येच ‘लढत’, काही ठिकाणी ‘चुरस’ तर कुठं ‘काटे की टक्कर’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली असून यामध्ये असे काही उमेदवार आहेत त्यांचे कुटुंब एकत्र आहे. मात्र, ते या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. कुटुंबातीलच सदस्य एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने याठिकाणी चुरशीची लढत पहायला मिळत आहे. एकाच कुटुंबातील सदस्य असले तरी त्यांचे विचार आणि वेगवेगळ्या पक्षांच्या चिन्हावर लढत आहेत.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात लढणाऱ्या काही उमेदवारांमध्ये रक्ताचे नाते आहे. त्यामुळे दोन पक्षात निवडणूक होत नसून रक्ताच्या नात्यातील दोघांमध्ये निवडणूक होत असल्याने या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीत कोण कुणावर मात करेल हे येत्या गुरुवारी (दि.24) म्हणजे निकालादिवशी समजले. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी आपणच विजयी होणार असल्याचा दावा केला असला तरी मतदारराजा कोणाच्या पारड्यात कौल टाकतो याची उत्सुकता लागली आहे.

Image result for dhananjay munde vs pankaja munde

परळीत बहिण विरूद्ध भाऊ –

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सगळ्यात हायहोल्टेज आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी लढत परळीमध्ये होत आहे. या ठिकाणी मुंडे कुटुंबातील बहिण-भाऊ एकमेकांच्या समोर उभे आहेत. भाजपकडून पंकजा मुंडे तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांच्यात होणारी लढत ही लक्षवेधी ठरली आहे. परळी विधानसभा मतदारसंघ स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. 2014 च्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा परभाव केला आहे.

Related image

बीडमध्ये काका Vs पुतण्या –

बीड विधानसभा मतदारसंघामध्ये काका-पुतण्या हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेचे जयदत्त शिरसागर यांच्या विरोधात राष्ट्रवादीने जयदत्त यांचे पुतणे संदीप क्षीरसगार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने याठिकाणीची लढत देखील चुरशीची आहे. या निवडणुकीत काका पुतण्याचा पराभव करणार की पुतण्या काकाचा पराभव करणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. दुसरीकडे बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघामध्ये पंडीत परिवारातील काका-पुतणे एकमेकांच्या समोर मैदानात उतरले आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडित तर बादामराव पंडीत हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत.

निलंग्यात ‘काटे की टक्कर’
लातूर जिल्ह्यातील निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये काटे की टक्कर होत आहे. या ठिकाणी माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांचे चिरंजीव अशोक निलंगेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर त्यांच्या विरोधात भाजपकडून संभाजीराव निलंगेकर हे निवडणूक लढवत आहेत. संभाजी निलंगेकर हे शिवाजीराव निलंगेकर यांचे पुतणे आहेत.

Visit  :Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like