‘बहुत कुछ लाईफ में फर्स्ट टाईम होता है’, भाजपच्या ‘रम्या’चा व्यंगचित्रातून खोचक ‘टोमणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘बहुत कुछ लाईफ में फर्स्ट टाईम होता है’ असा टोमणा मारणारे व्यंग चित्र सध्या सोशल मिडियावर फिरत आहे. भाजपच्या या ‘रम्या’ने बारामतीच्या साहेबांना डोस दिलाय. तुरुंगात न गेल्याचे सांगणाऱ्यांना रम्याने टोमणा मारण्याचा प्रयत्न केला आहे. ‘बहुत कुछ लाईफ में फर्स्ट टाईम होता है’ असा मथळा असलेला एक संवाद या व्यंगचित्रात दाखवण्यात आला आहे.

नक्की काय आहे शरद पवारांना टोमणा मारणाने व्यंगचित्र
या व्यंगचित्रामध्ये रम्याला एकजण म्हणतो की, रम्या, साहेब म्हणतात मी अनेक बरी-वाईट कामे केली. पण तुरुंगात कधी गेलो नाही. त्यावर लगेच रम्या उत्तर देतो, तो म्हणतो, ते जाऊ दे रे ! मुन्नाभाईचा डायलॉग बघ ना, म्हणतोय, बहुत कुछ लाईफ में फर्स्ट टाइम होता है रे.

या व्यंग चित्राला #बारामतीकरामती आणि @NcpSpeaks टॅग करण्यात आले आहे. या व्यंगचित्रातील हा टोमणा शरद पवार यांना आहे हे स्पष्ट होते.

शिखर बँक घोटाळा प्रकरणी ईडीने मंगळवारी संध्याकाळी शरद पवार, अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर ही कारवाई राज्य सरकाने निवडणुकीच्या तोंडावर सूड घेण्याच्या हेतूने केली असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला. शरद पवारांनी देखील बुधवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली, तसेच आपण शुक्रवारी ईडी कार्यालयात पाहुणचार घेण्यासाठी जाणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईचा राज्य सरकारशी काहीही संबंध नाही असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारीच सांगितले.

व्हायरल होत असलेल्या या व्यंगचित्रात कुठेही शरद पवारांचे नाव नाही. परंतू साहेब म्हणत आणि बारामतीच्या करामती यावरुन या व्यंगचित्राचा जोर दिसला. त्यामुळे आता राष्ट्रवादी आता याला कसे उत्तर देते हे पाहणे योग्य ठरेल. परंतू विधानसभेच्या निवडणूकीत प्रचाराच्या नावावर प्रचाराची पातळी खालावायला नको हीच सामान्यांची अपेक्षा आहे.

Visit : policenama.com