Maharashtra Assembly Winter Session 2023 | कांदा निर्यातबंदी, इथेनॉल निर्मितीवरील बंदीबाबत अजित पवार सभागृहात म्हणाले, ”गरज पडल्यास…”

नागपूर : Maharashtra Assembly Winter Session 2023 | कांदा निर्यात (Onion Exports) आणि इथेनॉल निर्मिती (Ethanol Production) प्रश्नांवर गरज पडल्यास केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) आणि पीयूष गोयल (Piyush Goyal) यांची भेट घेऊन मार्ग काढू. दुध उत्पादकप्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन शेतकऱ्यांना लवकरच दिलासा देऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सभागृहात (Maharashtra Assembly Winter Session 2023) दिले. विधानसभेत विरोधी पक्षांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव फेटाळल्यानंतर सदस्यांना आश्वासित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, अवकाळी पाऊस, संत्राउत्पादक, कापूसउत्पादक, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, कांदा निर्यातीवरील बंदी, ऊसापासून इथेनॉल निर्मितीवरील बंदी, मराठा आरक्षण (Maratha Reservation) यासारख्या सर्व महत्त्वाच्या मुद्यांवर सभागृहात चर्चा करु. त्यातून सर्वसहमतीने मार्ग काढण्याची सरकारची तयारी आहे.

अजित पवार म्हणाले, मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. अवकाळी पाऊस, दुध, संत्रा, कापूस, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकारमंत्री यांच्याशी चर्चा झाली आहे. सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. (Maharashtra Assembly Winter Session 2023)

अजित पवार म्हणाले, ऊसापासून इथेनॉलनिर्मितीवरील बंदीमुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांसमोरच्या
अडचणी वाढणार आहेत. याबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह, केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा
झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनीही याप्रश्नी लक्ष घालून मार्ग
काढण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

ते पुढे म्हणाले, येत्या शनिवारी किंवा रविवारी नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढू.
गरज पडल्यास पुढील आठवड्याच्या सुरुवातीला, मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांसह दिल्लीला जावून
केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पियुष गोयल यांची भेट घेऊ. यातून निश्चित मार्ग काढू.

सभागृहाला आश्वस्थ करताना अजित पवार म्हणाले, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आर्थिक तरतुदीची
गरज लागणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढू. मुख्यमंत्र्यांना वेळेअभावी बैठक
घेणे शक्य नसल्यास, मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने आपण स्वत: दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह
येत्या मंगळवारी बैठक घेऊन दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढू.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

किराणा माल विक्रेत्या व्यावसायिकाची 10 लाखांची फसवणूक, हडपसर परिसरातील प्रकार

Ajit Pawar | नवाब मलिकांसंदर्भातील फडणवीसांच्या पत्रावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले – ”त्या पत्राचे काय करायचे ते…”

Pune Crime News | जास्तीचे पैसे देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ महिलेची फसवणूक, येरवडा परिसरातील प्रकार