सुशिक्षीत बेरोजगारांसाठी खुशखबर ! राज्यात 12 हजार 500 पदांसाठी पोलिस भरती, गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात 12 हजार 500 पोलिसांची भरती केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. या प्रस्तावाला मंत्रिमंडळानेही मंजूरी दिली आहे. त्यामुळे पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील भरती प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, आता पुन्हा एकदा राज्यात लवकरच मेगा पोलीस भरतीसाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची घेण्यात आला.

कोरोना काळात पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेता उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पोलीस भरतीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. तब्बल दहा हजार पोलिसांची भरती यातून होऊ शकणार आहे. अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याने पोलिसांचं पुरेसे संख्याबळ उपलब्ध नाही. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मर्यादा येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पोलीस भरती करण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या.

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत पोलीस भरतीबाबत निर्णय झाल्याने बेरोजगारीच्या संकटात अनेक तरुणांना दिलासा मिळला आहे. कोरोना काळात फक्त आरोग्य आणि वैद्यकीय विभागात भरती सुरु होती. आर्थिक अडचणींमुळे इतर विभागातील भरती प्रक्रिया सरकारने बंद केली आहे. परंतु आता पोलीस भरतीला ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.