ज्या कपिल सिब्बलांना दारू पिलेलं म्हटलं त्यांनाच दिलं शिवसेनेनं ‘वकीलपत्र’, ‘या’ बड्या नेत्यानं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ज्या कपिल सिब्बलनी भगवान श्रीराम काल्पनिक आहेत, त्यांचं मंदिर बांधू नये म्हटलं होतं, त्यांच्यावर संजय राऊतांनी ‘सामना’त अग्रलेख लिहिला होता, तेच सिब्बल आता शिवसेनेचे वकील आहेत. असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला लगावला आहे. एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यातील सत्तास्थापनेबाबत शिवसेनेनं शनिवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पक्षकारांचे वकिल म्हणून कपिल सिब्बल (शिवसेना), अभिषेक मनु सिंघवी (राष्ट्रवादी) यांनी बाजू मांडली. याविषयी रावसाहेब दानवे म्हणाले की’ ज्या कपिल सिब्बलनी भगवान श्रीराम काल्पनिक आहेत, त्यांचं मंदिर बांधू नये म्हटलं होतं, त्यांच्यावर संजय राऊतांनी ‘सामना’त अग्रलेख लिहिला होता, तेच सिब्बल आता शिवसेनेचे वकील आहेत.

संजय राऊत यांनीच तेव्हा त्यांना दारु पिलेला म्हटले होतं. राष्ट्रवादी आणि भाजप यांचं सरकार स्थापन झालेलं आहे. अजित पवार हे अजूनही राष्ट्रवादीचे गटनेते आहेत आणि त्यांनी दिलेला व्हिप सर्व आमदारांसाठी बंधनकारक असेल. त्यांनी सांगितल्यानुसारच आमदारांना मतदान करावं लागेल.’

भाजपच्या नेत्यांना सत्तेसाठी वेड लागलं आहे. असं विधान संजय राऊत यांनी केलं होत त्याला प्रत्युत्तर देताना दानवे म्हणाले की, ‘आम्ही अनेक वेळा सत्तेत आलो. परंतु, सत्तेत येण्याआधीच संजय राऊत यांना वेड लागलं आहे. काय बोलावं का बोलू नये हे त्यांना सूचत नाही. त्यामुळे वेड्याच्या इस्पितळात दाखल करावं.’

Visit : Policenama.com