शिवसेना-भाजपमध्ये ‘फोन पे चर्चा’ सुरु !, उद्धव ठाकरेंनी हळूच दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यपालांच्या भुमिकेवर टीका केली. तसेच भाजपने शिवसेनेवर केलेले सर्व आरोप खोडून काढत आपण राष्ट्रवादीशी संपर्क केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे भाजपचा आरोप खोटा असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेमध्ये मित्र पक्षाकडून संपर्क केला जातोय का ? असा प्रश्न विचारला असता त्यांनी काहीसे होकारार्थी उत्तर दिले. दरवेळी संपर्कात जर नवनवीन गोष्टी ठरवल्या जाणार असतील तर अर्थ नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच हिंदुत्वामध्ये वचनबद्धता हे महत्त्वाचे कलम आहे. आम्हाला राम मंदीर पाहिजे. मात्र प्रभू रामचंद्र ज्या प्रमाणे सत्यवचनी होते, तसे वचन पाळायचं नसेल तर या हिंदुत्वाला अर्थ नाही, असेही त्यांनी म्हटले.

आम्ही याआधी आघाडीला पाठिंबा देण्यासाठी फोन किंवा संपर्क केला नाही हे काँग्रेसने त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं. त्यामुळे भाजपचा आरोप खोटा असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. युती जर तुटली असेल तर ती भाजपनेच तोडली आणि भाजप हा पर्याय संपला असेल तर तो भाजपनेच संपवला असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. युतीमध्ये अडीच वर्ष मुख्यमंत्री हा महत्त्वाचा मुद्दा होता. पण यावर भाजप खोटं बोलली आणि मला खोटं पाडलं. हे सगळं संतापजनक असल्याची प्रतिक्रियाही यावेळी उद्धव ठाकरेंनी दिली.

Visit : Policenama.com