पिसाळलेल्या कुत्र्यांकडे लक्ष देऊ नका, शिवसेना आमदाराचा BJPच्या ‘या’ माजी आमदारावर निशाणा

मीरा रोड : पोलीसनामा ऑनलाइन – मिरा भाईंदरमधून शिवसेना मुळासकट उखडून टाण्याचा दम देणाऱ्या भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. मात्र शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांना मेसेज करून मेहतांनी माफी मागितली होती. भावनेच्या भरात व मानसिक तणावात आपण बोलून गेल्याचे मेहतांनी फोन करुन सांगिल्याचे सरनाईक यांनी म्हटले आहे. तर पिसाळलेल्या कुत्र्याकडे लक्ष देऊ नका, शिवसेना संपवण्याची भाषा करणारे स्वत:च संपले असल्याचे सरनाईक यांनी कार्यकर्त्यांना म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे कलादालनास विरोध मेहतांना विधानसभा निवडणुकीत महागात पडला आहे. मेहतांनी उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांचे संस्कार काढले होते. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी विधानसभा निवडणुकीत मेहतांचा ठरवून पराभव केला. त्यामुळे खळवलेल्या मेहतांनी शिवसेनेवर थेट आरोप करत शिवसेना विश्वास घातकी पार्टी असल्याचे म्हटले होते. तसेच शिवसेना शहरातून मुळासकट संपवण्याचा दम दिला होता.

मेहता यांच्या या दमबाजीनंतर त्यांच्यावर सोशल मीडियातून टीका आणि निषेध, संताप व्यक्त करण्यात आला. नगरसेवक राजू भोईर यांनी तर शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्याला जनतेने संपवून टाकल्याचे म्हटले आहे. तसेच शिवसैनिकांना डिवचण्याचे काय परिणाम होतात हे मीरा भाईंदरच्या जागरुक जनतेने दाखवून दिले आहे. खोटी कर्म आणि केलेली पापं याचं प्रायश्चित्त करा, असा टोला भोईर यांनी मेहतांना लगावला.

शिवसेना संपण्याची भाषा करणाऱ्या मेहतांवर निशाणा साधताना सरनाईक म्हणाले, शिवसेनेला संपवण्याची भाषा करणारे स्वत: संपले आहे. त्यांचे कुत्र्यासारखे हाल झाले आहेत. त्यामुळे पिसाळलेल्या कुत्र्याकडे लक्ष देऊ नका अशी बोचरी टीका त्यांनी केली. मेहतांवर शिवसैनिक संतापले असल्याने सरनाईकांनीच समजूत काढली आणि शांत राहण्यास सांगितले.

Visit : Policenama.com