‘किल्ल्यांवर ‘छमछम’ची हौस असेल तर चौफुल्याला जा’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – किल्ल्यावर छमछम करण्याची एवढीच हौस असेल तर चौफुल्याला जा असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली आहे. गडकिल्ले भाड्याने देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाची पाठराखण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी केल्याने पवारांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. हडपसर येथील महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि किल्ले लग्न कार्यासाठी द्यायचे हे धोरण चुकीचे आहे. किल्ले हा महाराष्ट्राचा, मराठ्यांचा इतिहास आहे. एवढा बार, छमछममध्ये रस असेल तर चौफुल्याला जा आणि काय करायचे ते करा.” असे त्यांनी म्हटले आहे.

उदयनराजे भोसले यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, “गडकिल्ले लग्न समारंभासाठी दिले तर आपली अर्थव्यवस्था सुधारेल.” उदयनराजेंच्या या वक्तव्याचा पवारांनी अप्रत्यक्षपणे समाचार घेतला आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी