बंडखोरांमुळं भाजप-शिवसेनेला फटका बसणार : एकनाथ खडसे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये भाजप-शिवसेना महायुतीला 200 च्या वर जागा मळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, निवडणुकीत शिवसेना-भाजपला राज्यात बंडखोरांचा सामना करावा लागला. राज्यात बंडखोरी झाली नसती तर युतीच्या 4 ते 5 जागा वाढल्या असत्या असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

खडसे पुढे म्हणाले, महायुतीला राज्यामध्ये 200 च्या वर जागा मिळतील असे याआधीच सांगितले होते. एक्झिट पोलचे आकडे देखील महायुतीला 200 च्या वर जागा मिळतील आणि महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन होईल असे स्पष्ट झाले आहे. मात्र, राज्यात काही ठिकाणी झालेल्या बंडखोरीचा फटका महायुतीला बसू शकतो. बंडखोरी झाली नसती तर राज्यात महायुतीच्या जागा आणखी वाढल्या असत्या असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

मुक्ताईनगरमध्ये बंडखोरांवर कारवाई नाही
राज्यात ज्याप्रमाणे बंडखोरांवर कारवाई झाली तशी कारवाई मुक्ताईनगरमध्ये झाली नाही. मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेचे बंडखोर उभे राहिले मात्र त्याच्यावर कारवाई झाली नाही. या ठिकाणी बंडखोर उभे आहेत त्याचे पडसाद अन्य ठिकाणी उमटले असणार, बंडखोरांवर कारवाई होणं गरजेचे होते. अन्य ठिकाणी शिवसेनेने बंडखोरांवर कारवाई केली. मात्र, मुक्ताईनगरमध्ये नाही. तरीही रोहिणी खडसे 15 हजार मताधिक्याने निवडून येणार असल्याचा दावा खडसेंनी केला.

राज्यातील विविध चॅनल्सनी दाखवलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 120-140 जागा तर शिवसेनेला 80-100 जागा मिळतील असे सांगण्यात आले आहे. तर विरोधकांना अवघ्या 40-60 जागा जिंकता येतील असं सांगितले आहे. असे असले तरी गुरुवारी निकालानंतर सर्व चित्र स्पष्ट होऊन कोणाचे सरकार स्थापन होणार हे समजेल.

Visit : Policenama.com