‘सिल्लोडमध्ये सभा घ्या, अन्यथा भोकरदनमध्ये त्रास होईल’, शिवसेनेच्या नेत्याचा भाजपच्या केंद्रीय मंत्र्याला ‘धमकी’वजा ‘इशारा’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची सिल्लोड येथील प्रचार सभेवरून राजकीय कोंडी झाली आहे. सिल्लोडमध्ये सभा घेतली तर भाजपचे पदाधिकारी, कर्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, जर सभा घेतली नाही तर महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांचा भोकरदनमध्ये त्रास सहन करावा लागणार आहे. युती धर्म पाळायचा, पक्ष कार्यकर्त्यांकडे पहायचे की, भोकरदनमध्ये मुलासाठी राजकीय गणित जुळवायचे, अशा कात्रीत दानवे सापडले आहेत.

युतीधर्मात रावसाहेब दानवे यांना अब्दुल सत्तार यांच्यासाठी सिल्लोड मतदारसंघामध्ये सभा घेणे गरजेचे आहे. मात्र, भाजप कार्यकर्त्यांनी दानवे यांना सभा घेण्यास विरोध केला आहे. तर दुसरीकडे दानवे यांनी सिल्लोडमध्ये सभा घेतली नाही तर त्याचे पडसाद भोकरदनमध्ये उमटतील असा धमकीवजा इशारा अब्दुल सत्तार यांनी दिल्याची चर्चा मतदारसंघात आहेत. सभा घेतली तर पक्षाचे कार्यकर्ते नाराज होतील, नाही घेतली तर मुलाच्या जय-पराजयाचे गणित जुळविण्यासाठी त्रास होऊ शकतो. त्यामुळे दानवे यांची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे.

विधानसभा निवडणुकीत सिल्लोड मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेकडे देण्यात आला आहे. या ठिकाणी अब्दुल सत्तार यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज भाजपच्या कार्यकर्त्यांनी राजीनाम्याचे अस्त्र उपसले. त्या नाराजीतूनच प्रभाकर पालोदकर यांची अपक्ष म्हणून उमेदवारी पुढे आली आहे. सभा घेतली तर नाराज भाजप कार्यकर्त्यांचा रोष भोकरनमध्ये उमटू शकतो. भोकरदन मतदारसंघामध्ये सिल्लोड येथील भाजप पदाधिकाऱ्यांची नातेवाईक मोठ्या प्रमाणात आहेत. अशा परिस्थितीत रावसाहेब दानवे नेमका कोणता मार्ग काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी