सरकार स्थापनेबाबत उद्धव ठाकरेंची सोनिया गांधीशी ‘फोन पे चर्चा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधक एकत्र येण्याची शक्यता आहे. भाजपने सत्तास्थापन करण्यास असमर्थता दाखवल्यानंतर शिवसेनेला सरकार स्थापन करण्यास निमंत्रण देण्यात आले. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्तास्थापन करण्याचा दावा करण्यासाठी शेवटचे काही तास शिल्लक असताना घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्याशीदेखील चर्चा केली असल्याची सुत्रांची माहिती आहे. आज दिवसभर राजकीय वर्तुळात भेटी गाठी आणि बैठकांचे सुत्र सुरु आहे. शिवेसना खासदार संजय राऊत यांच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. तर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि खासदार अनिल देसाई हे सकाळपासून दिल्लीत ठाण मांडून आहे. त्यामुळे राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.

सोनिया, राहुल आणि प्रियांका यांच्यात मतभेद
शिवसेनेला पाठिंबा द्यायचा कि नाही यावर चर्चा करण्यासाठी सोनिया गांधी यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांना दिल्लीत बोलावून घेतले आहे. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी बैठक सुरु असून सोनिया गांधी यांनी आमदारांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन राहूल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी विरोध केला आहे. शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय सोनिया गांधी घेणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाची स्वप्न धूसर होताना दिसून येत आहेत.

Visit : Policenama.com