शिवसेना राज्यपालांना भेटून ‘सत्तास्थापन’ करणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपने सत्तास्थापनेस नकार दिल्यानंतर आज संध्याकाळी 7.30 पर्यंत शिवसेनेला राज्यपालांनी वेळ दिली आहे. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून शिवसेनेचं शिष्टमंडळ दुपारी 2.30 वाजता राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती आहे.

शिवसेनेला सत्ता स्थापनेच आमंत्रण मिळाल्यानंतर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना सत्ता स्थापन करणार ची माहिती दिली. राऊत म्हणाले की , सर्वच नेत्यांचा एकमेकांशी प्रेमाचा संवाद सुरू आहे. प्रत्येक नेत्याला राज्याविषयीच्या कर्तव्यांची जाण आहे. राज्यात अस्थिरता राहू नये. राष्ट्रपती राजवटी आणण्याचा प्रयत्न होतोय. त्याला आव्हान द्यावं यावर शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी यांचं एकमत आहे. ज्यांनी खोटं बोलून अंहकाराच्या भूमिकेतून राज्याला या परिस्थितीत ढकललं ते महाराष्ट्राचे गुन्हेगार आहेत. त्यामुळं भाजपाचा मुख्यमंत्री नको असं गेल्या काही दिवसांपासून राज्यातील प्रमुख पक्षांची भूमिका आहे. शिवसेनेवर राज्यपालांनी सरकार बनविण्याची जबाबदारी देत निमंत्रण दिलं. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत सरकार बसविण्याचा प्रयत्न करणार आहोत असं संजय राऊतांनी सांगितले आहे. शेतकरी, बेरोजगारी, महागाई या किमान समान सूत्रांवर हे सरकार स्थापन होणार आहे,” असा दावा राऊत यांनी केला.

शिवसेना आमदारांची महत्वपूर्ण बैठक ‘द रिट्रिट हॉटेल’मध्ये सकाळी पार पडली. या बैठकीत राज्यपालांना देण्यात येणाऱ्या पत्रावर शिवसेनेच्या आमदारांची सही घेण्यात आली. त्यानंतर हे पत्र घेऊन शिवसेना नेते मातोश्रीच्या दिशेने रवाना झाले.

शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची मुंबईत वाय. बी. सेंटरमध्ये बैठक सुरू आहे तर दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत आहेत. शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही, यावर या बैठकींत निर्णय होण्याची शक्यता आहे.

Visit : Policenama.com