विधानसभा 2019 : राज्यातील ‘या’ 10 मतदार संघात ‘प्रतिष्ठे’ची लढाई, जाणून घ्या सविस्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात विधानसभेसाठी 288 मतदार संघामध्ये निवडणुका होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ अशा अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. एक नजर टाकुयात महाराष्ट्रातील दहा मतदारसंघावर जिथे अटीतटीची निवडणूक पहायला मिळणार आहे.

Image result for devendra fadnavis vs ashish deshmukh

देवेंद्र फडणवीस विरुद्ध आशिष देशमुख (नागपूर दक्षिण पश्चिम) –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आव्हान आहे ते काँग्रेसच्या आशिष देशमुख यांचं. हा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला मानला जातो आधीही दोनदा या ठिकाणाहून मुख्यमंत्री निवडून आलेले आहेत.

नागपुर दक्षिण – पश्चिम विधानसभा मतदारसंघात तब्बल 3,41,330 मतदार आहेत. 2014 च्या विधानसभेच्या निवडणुकीत फडणवीस यांचा 58,942 मतांनी विजय झाला होता आणि त्यांना 59.21 % मते मिळाली होती, तर काँग्रेसच्या उमेदवाराला 28.57 % मते मिळाली होती.

Image result for aditya thackeray vs suresh mane

आदित्य ठाकरे विरुद्ध सुरेश माने (वरळी) –
आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आहेत तसेच ठाकरे कुटुंबातील आदित्य हे पहिले व्यक्तिमत्व आहे जो थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. वरळी हा मतदारसंघ दक्षिण मुंबईमध्ये येतो. अनेक वर्षांपासून हा मतदारसंघ शिवसेनेकडेच होता. तसेच येथील राष्ट्रवादीचे माजी आमदार सचिन अहिरे देखील यावेळी आदित्य ठाकरे यांच्या सोबत आहे.

आदित्य ठाकरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश माने यांचे आव्हान आहे. मात्र राष्ट्रवादीची या ठिकाणी आता ताकद उरलेली नाही. या मतदारसंघात एकून 2,65,091 मतदार यावेळी मतदान करणार आहेत. गेल्या विधानसभेला या ठिकाणच्या शिवसेना उमेदवाराला 55 % मते मिळाली होती.

Image result for ajit pawar vs gopichand padalkar

अजित पवार विरुद्ध गोपीचंद पडळकर ( बारामती )
बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे या ठिकाणाहून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे रिंगणात आहेत. या आधी सहा वेळा अजित पवार या ठिकाणाहून निवडून आलेले आहेत. भारतीय जनता पक्षाने यावेळी अजित पवारांविरोधात गोपीचंद पडळकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. पडळकर हे धनगर समाजाचे नेतृत्व करतात आणि बारामतीत धनगर समाज मोठ्या प्रमाणावर आहे. अधिकृत पक्षांव्यतिरिक्त आणखी पंधरा उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत.

Image result for chandrakant patil vs kishor shinde

चंद्रकांत पाटील विरुद्ध किशोर शिंदे (कोथरूड )
पुण्यातील कोथरूड हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो त्यामुळे यावेळी या ठिकाणाहून भाजपने विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना खाली बसवून पक्षासाठी संघटनेचं काम करणारे चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

पाटील यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किशोर शिंदे रिंगणात आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या मतदार संघात आपला उमेदवार दिलेला नाही. पहिल्यांदाच पुण्यामध्ये भाजपने बाहेरच्या उमेदवाराला तिकीट दिले आहे. कोल्हापूर हे चंद्रकांत पाटील यांचे कार्यक्षेत्र आहे.

Image result for prithviraj chavan vs atul bhosale

पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध अतुल भोसले (दक्षिण कराड )
कराड दक्षिणच्या भागातून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. त्याच्या विरोधात भाजपचे अतुल भोसले हे निवडणूक लढवताहेत. त्याचप्रमाणे आणखी एकवीस उमेदवार देखील या मतदार संघातून रिंगणात आहेत.

Image result for pankaja munde vs dhananjay munde

पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे ( परळी )
पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे परळी मधून एकमेकांच्या विरोधात आहे. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष या मतदारसंघाकडे लागून आहे. काही दिवसांआधी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये परळीत राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढलेले होते. त्यामुळे यावेळची लढाई ही पंकजा मुंडे यांच्यासाठी अवघड मानली जात आहे.

छगन भुजबळ विरुद्ध संभाजी पवार (येवला)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे येवल्यातून निवडणूक लढवताहेत शिवसेनेचे संभाजी पवार हे त्यांच्या विरोधात निववडणूक लढवताहेत तसेच वंचित बहुजन आघाडीने देखील या मतदारसंघात आपला उमेदवार दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी तिरंगा लढत पहायला मिळणार आहे. छगन भुजबळ हे शिवसेनेत जाणार अशी मोठी चर्चा निवडणुकीआधी होती मात्र स्थानिक शिवसैनिकांनी त्यांना जोरदार विरोध केला होता.

Image result for rohit pawar vs ram shinde

रोहित पवार विरुद्ध राम शिंदे ( कर्जत जामखेड )
राम शिंदे हे कर्जत जामखेडमधील भाजपचे उमेदवार आहेत. राम शिंदे हे अहमदनगरचे पालकमंत्री आहेत तर त्यांच्या विरोधात शरद पवारांचे नातू रोहित पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसमवेत शरद पवारांनी देखील या मतदारसंघासात मोठी ताकद लावलेली आहे.

Image result for nitesh rane vs satish sawant

नितेश राणे विरुद्ध सतीश सावंत ( कणकवली )
नितेश राणे हे यावेळी भाजपच्या तिकिटावरून कणकवली मतदार संघातून निवडनू लढवताहेत. कणकवली हा राणे कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे राज्यात युतीमध्ये असलेली शिवसेना याठिकाणी भाजप विरोधात आहे. राणे आणि शिवसेना हा वाद अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे.
कणकवली मध्ये शिवसेनेचे सतीश सावंत हे नितेश राणे यांच्या विरोधात निवडणूक लढवताहेत. राणे विरुद्ध शिवसेना अश्या होणाऱ्या या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

Nalasopara
File Photo

प्रदीप शर्मा विरुद्ध क्षितिज ठाकूर ( नालासोपारा )
पोलीस प्रशासनात एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले प्रदीप शर्मा हे नालासोपारा येथून पहिल्यांदाच शिवसेनेकडून विधानसभा लढवताहेत. तर त्यांच्या विरोधात नाला सोपाऱ्याचे विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर यांचे आव्हान आहे. ठाकूर हे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्या व्यतिरिक्त या मतदारसंघातून आणखी एकोणीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Visit  :Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like