अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. किरण लहामटे एवढ्या मतांनी विजयी

ADV

अकोले : पोलीसनामा ऑनलाईन – अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. किरण लहामटे भाजपचे वैभव पिचड यांचा 57689 मतांनी पराभव केला. पहिल्या फेरीपासून राष्ट्रवादीचे डॉ.किरण लहामटे आघाडीवर होते.

अकोले विधानसभा मतदार संघात डॉ.किरण लहामटे विरुद्ध माजी मंत्री मधुकर पिचड यांचे पुत्र वैभव पिचड या कट्टर विरोधकांमध्ये लढत झाली. निवडणुकीपुर्वी आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2014 च्या निवडणुकीत वैभव पिचड पहिल्यांदा राष्ट्रवादीकडून आमदार झाले होते त्याआधी त्यांचे वडील माजी मंत्री मधुकर पिचड सातवेळा या मतदारसंघातून आमदार झाले होते. मधुकर पिचड चार वेळा काँग्रेसकडून तर तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार झाले होते. मधुकर पिचड हे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते.

ADV

निवडणुकीपूर्वी पिचड राष्ट्रवादीकडून आमदार होते तर डॉ.किरण लहामटे हे भाजपकडून जिल्हा परिषद सदस्य होते. निवडणुकीपूर्वी दोघांनीही पक्षांतर केले होते.

अकोले मतदारसंघ

1. डॉ. किरण लहामटे (राष्ट्रवादी काँग्रेस ) – 113414 (विजयी)

2. वैभव पिचड (भाजप ) – 55725

3. दिपक यशवंत पथवे (वंचित बहुजन अघाडी) 1817

4. घाणे भिवा रामा ( अपक्ष ) 1014

NOTA 2298

Visit : Policenama.com