वाढत्या ‘कोरोना’ रूग्णांच्या पार्श्वभुमीवर राज्यात 31 जुलैपर्यंत वाढवला लॉकडाऊन, जाणून घ्या नियमावली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोना विषाणूची धोकादयाक परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने 31 जुलै पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषत: मुंबई आणि पुणे येथे कोरोना विषाणूच्या संसर्गाची तीव्रता वाढली आहे. संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

लॉकडाऊनच्या अटी
– मास्क घालणे अनिवार्य
– दोन यार्ड (सोशल डिस्टन्सिंग) अंतर ठेवणे आवश्यक
– मोठ्या संख्येने जमणाऱ्या जमावर बंदी, लग्न कार्यात फक्त 50 पाहुण्यांना परवानगी, अंत्यसंस्काराला 50 पेक्षा अधिक लोकांना हजर राहता येणार नाही.
– सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल

कामाच्या ठिकाणच्या सूचना
– जेवढे शक्य असेल तितके घरातूनच काम करा, कार्यालयात वेगवेगळ्या शिप्टमध्ये काम करा
– कर्मचाऱ्यांची स्क्रिनिंग आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी
– कार्यालय वारंवार स्वच्छ करा

मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर यासारख्या शहरांमध्ये काही निर्बंधांसह या सेवांमध्ये सूट

– पूर्वीच्या आदेशानुसार जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु राहतील
– जिवनावश्यक नसलेल्या वस्तूंची दुकाने उदा. मार्केट प्लेस, मॉल्स सकाळी 9 ते 5 पर्यंत सुरु राहतील
– ई-कॉमर्स, अन्नाची होम डिलीव्हरी, बांधकाम साईट्सवर सूट (सरकारी आणि खासगी)
– 10 टक्के किंवा 10 कर्मचाऱ्यांवर कार्यालये उघडली जातील
– ट्रॅक्सी, कॅब चालकासह 2 प्रवाशांना प्रवास करता येईल
– दुचाकीवर फक्त एकालाच प्रवास करता येईल
– प्लंबर, इटेक्ट्रीशियन, मोटार गॅरेजला परवानगी (आधीची परवानी आवश्यक)
– अनावश्यक कामांसाठी लांब पल्ल्याच्या प्रवासावर निर्बंध
– एमएमआर क्षेत्रात आवश्यक आणि कार्यालयीन कामासाठी येण्या-जाण्यासाठी परवानगी
– मर्यादित लोकांसह विवाह आणि अंत्यसंस्कारास परवानगी, नॉन एसी हॉलमध्येच लग्नाला परवानगी
– घराबाहेर जाण्यास परवानगी
– वृत्तपत्र आणि डोर टू डोर डिलिव्हरीत सूट
– न्हावी दुकान, सलून, ब्युटी पार्लरला परवानगी
– उर्वरित राज्यात बंदी घातेल्या कामांवर निर्बंध घालून ते काम सुरु केले जाऊ शकते.
– सर्व सार्वजनिक आणि खासगी वाहतूक प्रवासी व्यवस्थापनाची काळजी घेतली
– तीन चाकी वाहनात चालकाव्यतिरिक्त दोन प्रवासी असतील
– फोर व्हीलरमध्ये चालकाव्यतिरिक्त 2 प्रवाशांना परवानगी
– जिल्ह्यांत 50 टक्के चालणाऱ्या प्रवासी बसेसमध्ये सामाजिक अंतर व स्वच्छता आवश्यक
– नियमांनुसारच बेसेस जिल्ह्या बाहेर जातील