‘काकानं हात काढला तर पानपट्टीवाला तरी अजित पवारांना विचारल का’ ?, ‘या’ पक्ष प्रमुखांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षांचं सरकार येणार असं वाटत असतानाच भाजपनं राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या मदतीने आज अचानक मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी घडवून आणला. त्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार टीकेचे धनी ठरले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र त्यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये राज ठाकरेंनी टीका केली आहे. हा व्हिडिओ काही राष्टवादीच्या कार्यकर्त्यांकडून शेयर केला जात आहे.

जुना असला तरी आजच्या घडीलाही तंतोतंत लागू होत आहे. असे म्हणत अनेकांकडून तो व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.

काय आहे व्हिडिओ
राज ठाकरेंनी सोलापूर येथील सभेत अजित पवारांवर घणाघाती टीका केली होती. अजित पवारांच्या टीकेला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले होते की , 50-52 वर्षाचे झाले तर काकाच्या जीवावरच जगतात, किती दिवस जगणार असे राज यांनी म्हटले होते. त्याच भाषणात, काकांनी हात काढला तर पानपट्टीवालाही विचारणार नाही, अशी टीकाही राज यांनी अजित पवारांवर केली होती.

Visit : Policenama.com