साईं बाबांची नगरी शिर्डीमध्ये बंद राहतील हॉटेल आणि लॉज

मुंबई : कोरोना व्हायरसला सर्वाधिक तोंड द्यावेत लागत असलेल्या महाराष्ट्रात सुमारे साडेतीन महिन्यानंतर बुधवारी हॉटेल आणि लॉज उघडले. परंतु, साईंबाबांची नगरी शिर्डीमध्ये हॉटेल बंद ठेवण्यात आले आहेत. येथील हॉटेल मालकांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत साईंबाबांचे मंदिर उघडत नाही, तोपर्यंत हॉटेल उघडण्यात काहीही फायदा नाही.

महाराष्ट्रातील महाविकास आघाड़ी सरकारने 33 टक्के स्टाफसह हॉटल आणि लॉज उघडण्याची परवानगी दिली आहे. यासोबतच, हॉटलमध्ये थांबणार्‍यांसाठी गाईडलाइन ठरवण्यात आली आहे. शिर्डीचे स्थानिक नेते तुषार बोनकर यांनी सांगितले की, शिर्डीचा व्यवसाय साईंबाबा मंदिरावर अवलंबून आहे.

कोरोना संसर्गाच्या पूर्वीसुद्धा साईबाबांचे जन्मस्थळ असलेल्या पाथरीवरून वाद सुरू झाल्याने शिर्डी बंद होती. यानंतर लॉकडाऊनमुळे साडेतीन महिन्यांपासून येथे आर्थिक हालचाली पूर्णपणे ठप्प आहेत. यामुळे शिर्डीचे अर्थकारण पूर्णपणे बिघडले आहे.

जोपर्यंत साईबाबांचे मंदिर उघडले जात नाही तोपर्यंत हॉटेल उघडण्याची शक्यता नाही. हॉटल व्यवस्थापक मार्क जॅकब उर्फ पंडित यांनी सांगितले की, शिर्डी परिसरातील 25 गावातील हजारो कुटुंबे साईबाबा मंदिरावर अवलंबून आहेत. यामुळे मंदिर बंद झाल्याने त्यांचाही व्यवसाय ठप्प झाला आहे.

शिर्डीमध्ये एकावेळी थांबू शकतात 50 हजार भाविक
शिर्डीत श्रीसाई संस्थानच्या भक्त निवासशिवाय सुमारे साडेसात हजार हॉटेल आहेत. जेथे 50 हजार लोक राहू शकतात. राज्य सरकारने म्हटले आहे की, एकुण क्षमतेच्या 33 टक्के ग्राहकांना हॉटेलमध्ये थांबता येईल. याअंतर्गत शिर्डीत 15 ते 16 हजार लोक एकावेळी शिर्डीच्या हॉटेल्समध्ये थांबू शकतात.