…म्हणून विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे आघाडीत येण्याची शक्यता : शरद पवार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी आघाडी होऊ शकते असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येउन ठेपली आहे. विशेष म्हणजे ११ एप्रिल रोजी देशातील पहिल्या टप्प्याचे मतदानही झाले आहे. याचदरम्यान, कोल्हापूर लोकसभा मतदार संघात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळेची बोलतांना शरद पवार यांनी सध्या देशाला मोदी-शहा ही जोडी घातक आहे, हे राज ठाकरे यांना राज्यातील जनतेला सांगायचे आहे.त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचे उमेदवार असतील. असे शरद पवार यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, आपला देश, राज्य सध्या चुकीच्या हातात आहे. त्यामुळे आपला देश, राज्य या चुकीच्या हातातून काढण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी आघाडी होऊ शकते. असेही त्यांनी म्हंटले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like