Maharashtra MLC Election 2022 | नाथाभाऊ इज बॅक ! भाजपचे 5 शिवसेनेचे 2, काँग्रेस 1 आणि राष्ट्रवादीचे 2 उमेदवार विजयी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra MLC Election 2022 |  अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर काँग्रेसने (Congress) दोन मतांवर आक्षेप घेतला. त्यामुळे मतमोजणी (Counting of votes) दोन तास उशीराने सुरु झाली. मतमोजणी सुरु झाल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) प्रत्येकी एक मत बाद करण्यात आले. त्यामुळे काही वेळ मतमोजणी पुन्हा बंद करण्यात आली. या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा धक्का दिला आहे (Maharashtra MLC Election 2022). भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले असून काँग्रेसचा एक उमेदवार पराभूत झाला आहे.

 

मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यानंतर एकूण नऊ उमेदवार विजयी झाले. पहिल्या फेरीमध्ये रामराजे निंबाळकर आणि उमा खापरे यांच्या कोट्यातील प्रत्येकी एक मत बाद झाल्यानंतर पहिल्या पसंतीच्या मतासाठी 25.73 चा कोटा ठरवण्यात आला होता. त्यानंतर हा निकाल जाहीर करण्यात आला. पहिल्या टप्प्यात भाजपचे राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर यांचा तर महाविकास आघाडीच्या रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे, सचिन अहिर आमशा पाडवी विजयी झाले.(Maharashtra MLC Election 2022)

 

विधानपरिषदेतील विजयी उमेदवार

राष्ट्रवादी काँग्रेस

रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar)
एकनाथ खडसे (Eknath Khadse)

 

शिवसेना (Shivsena)

आमशा पाडवी (Amsha Padvi)
सचिन अहिर (Sachin Ahir)

 

भाजप (BJP)

प्रवीण दरेकर (Praveen Darekar)
राम शिंदे (Ram Shinde)
श्रीकांत भारतीय (Shrikant Bhartiya)
उमा खापरे (Uma Khapare)
प्रसाद लाड (Prasad Lad)

 

काँग्रेस (Congress)

चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) हे सुरुवातीला विजयी झाले असे सांगितले जात होते पण आता काँग्रेसचे भाई जगताप हे विजयी झाले असे सांगण्यात येत आहे.

 

काँग्रेसच्या तक्रारीमुळे मतमोजणीला विलंब

विधान परिषदेसाठी गुप्त मतदान करण्याची पद्धत आहे. मात्र भाजपच्या लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी दुसऱ्याच्या हातात मतपत्रिका दिल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. अशी तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती. राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसची ही तक्रार फेटाळून लावली होती. काँग्रेसच्या तक्रारीमुळे पाच वाजता सुरु होणारी मतमोजणी 7 वाजता सुरु झाली.

 

काँग्रेसचे मते फुटली

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप  यांच्यात चुरशीची लढत झाली. काँग्रेसकडे 44 मते असताना त्यांना पहिल्या पसंतीची 41 मते पडल्याने त्यांची तीन मते फुटल्याचे पहायला मिळत आहे.

 

देवेंद्र फडणवीसांचा चमत्कार कायम

राज्यसभेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चमत्कार घडवत भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार (Shiv Sena candidate Sanjay Pawar) पराभूत झाले होते. त्यामुळे विधान परिषदेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सर्व सूत्र आपल्या हातात घेतली होती. त्यांनी सर्व आमदार आपल्याच देखरेखीखाली ठेवली होती. मतदानाच्या दिवशीही मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांशी चर्चा करुन मतदानाला पाठवले. यावेळी शिवसेनेनं कोणताही दगाफटका नको म्हणून आपल्याच आमदारांच्या संख्याबळावर आपले उमेदवार विजयी करण्यावर भर दिला होता. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी केलेला प्लान यशस्वी ठरला असून भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत.

 

Web Title :- Maharashtra MLC Election 2022 | maharashtra mlc election result five bjp candidates win

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Police | यंदाचा पालखी सोहळा अनुभवता येणार ‘एका क्लीकवर’, पुणे पोलिसांकडून नागरिकांसाठी खास सोय

 

SBI Annuity Deposit Scheme | एसबीआयच्या या स्कीममध्ये एकदा जमा करा पैसे, दरमहिना व्याजासह होईल मोठी कमाई

 

ED Summon To Anil Parab | परिवहन मंत्री अनिल परब यांना पुन्हा ED कडून समन्स