Maharashtra Monsoon Update | मोसमी पाऊस महाराष्ट्राच्या वेशीवर; सरासरी जोरदार पावसाची शक्यता – IMD

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Update | गेल्या काही दिवसांपासून पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यानुसार मोसमी पावसाचे केरळमध्ये (Kerala) 29 मे रोजी आगमन झाल्यानंतर आता त्याचा प्रवास पुढे सरकत आहे. सध्या मोसमी पावसाचे महाराष्ट्रात आगमन (Maharashtra Monsoon Update) होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात काल (गुरूवारी) रिपरिप दिसून आली. दरम्यान, असं असलं तरी जून महिन्यात कमीच पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department-IMD) वर्तवला आहे.

 

यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरी 101 टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर वाऱ्याचा वेग कमी असल्याने जूनमध्ये पावसाचा खंड पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ऑगस्ट ते सप्टेंबर (August To September) महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहील. कमी दिवसांमध्ये जास्त पाऊस आणि काही काळ पावसात मोठा खंड पडण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. (Maharashtra Monsoon Update)

दरम्यान, पुढील चार आठवड्यासाठी पावसाच्या विस्तारित अंदाजानुसार दुसऱ्या
आठवड्यापासून म्हणजे 10 जूनपासून पश्चिम व पूर्व किनारपट्टीवर पाऊस वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

 

Web Title :- Maharashtra Monsoon Update | monsoon on the border of maharashtra average heavy rainfall forecast in state marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा