Maharashtra Municipal Election 2022 | राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीचा मोठा निर्णय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Municipal Election 2022 | महाराष्ट्रात लवकरच काही जिल्ह्यातील महापालिका निवडणुकीची (Maharashtra Municipal Election 2022) रणधुमाळी सुरू होणार आहे. नवी मुंबईसह (Navi Mumbai) अन्य मुख्य जिल्ह्यातील महापालिकांची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपली रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, सध्या मुंबई महापालिकेत शिवसेनेचे (Shivsena) वर्चस्व आहे. विरोधकांना चितपट करण्यासाठी मुंबईत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) एकत्र लढणार असल्याची चर्चा रंगली आहे.

 

नवी मुंबई महापालिकेच्या आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत एकत्र निवडणूक लढण्याबाबत चर्चा झाली. या चर्चेत जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरही चर्चा झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे (Shashikant Shinde), शिवसेना नेते विजय नाहटा (Vijay Nahta), काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक (Anil Kaushik) उपस्थित होते. या बैठकीमध्ये 31 मे रोजी जाहीर होणाऱ्या आरक्षणानंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, याबाबत झालेला निर्णय प्रदेश पातळीवर पावण्यात येणार असल्याचं बोलंलं जात आहे. अशी माहिती सूत्राकडून सांगण्यात येत आहे. (Maharashtra Municipal Election 2022)

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत.
भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुंबईत मागील दोन आठवड्यात 2 पेक्षा अधिक जाहीर सभा झाल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीही जाहीर सभा घेतली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसापुर्वी मुंबई पालिकेच्या सत्तेवरून भाजपने शिवसेनेला इशारा दिला आहे.
त्याचबरोबर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचीही (MNS Chief Raj Thackeray) सभा झाली आहे.
आगामी काळामध्येही सर्वच पक्ष आपला पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार हे साहजिकच आहे.

 

Web Title :- Maharashtra Municipal Election 2022 | shiv sena congress and ncp may be contest together in navi mumbai municipal corporation elections 2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा