Maharashtra Police Corona | राज्य पोलीस दलाला कोरोनाचा ‘विळखा’ ! एकाच दिवसात 298 पोलीस बाधित, 2 डोस घेतल्यानंतरही 1625 पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांना लागण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police Corona | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत राज्य पोलीस दलाला कोरोनाचा (Coronavirus) मोठा विळखा पडला आहे. दररोज कोरोना बाधित पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांची संख्या वेगाने वाढत आहे. आतापर्यंत एकूण १६२५ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना तिसर्‍या लाटेत कोरोनाची लागण झाली आहे. त्यात ३७१ पोलीस अधिकारी असून १२५४ पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतानाही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, मुंबईतील एका पोलीस कर्मचार्‍याला (Mumbai Police) कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आतापर्यंत गेल्या काही दिवसात ३ पोलिसांचा मृत्यु झाला आहे. (Maharashtra Police Corona)

गेल्या २४ तासात राज्यातील २९८ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात ७५ आयपीएस अधिकारी (IPS Office) आहेत. पहिल्या लाटेत पोलीस कर्मचारी हे अधिक संख्येने कोरोना बाधित झाले होते. त्यामानाने दुसर्‍या लाटेत ही संख्या कमी होती. आता जवळपास सर्व पोलिसांनी लसीचे दोन्ही डोस (Corona Vaccine) घेतले आहेत. त्यामुळे आपल्याला कोरोनाची लागण होणार नाही, अशी मानसिकता तयार झाल्याचा मोठा फटका सध्या राज्य पोलीस दलाला बसत आहे (Maharashtra Police Corona). त्यातच तिसर्‍या लाटेत कोरोनाची लक्षणे व त्रास दिसून येत नसला तरी त्याचा वेगाने फैलाव होत असल्याचे रस्त्यावर असलेल्या पोलिसांना त्याची लागण होताना दिसत आहे.

Web Title : Maharashtra Police Corona | 298 maharashtra policemen were infected, 1625 police officers were infected even after taking 2 doses

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Crime News | पोलीस वसाहतीमध्ये गृहरक्षक तरुणीने घेतले जाळून

7th Pay Commission Update | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये क्रेडिट होतील 2 लाख रुपये,
18 महिन्याच्या DA एरियर बाबत मोठे अपडेट

CP Amitabh Gupta | आज रात्रीपासून संचारबंदीची अंमलबजावणी, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती (व्हिडिओ)

Zero Rupee Note In India | झीरो रुपयाची नोट छापण्याची भारतात का भासली होती गरज? जाणून घ्या कारण

 

Deltacron Corona Variant | कोरोनाचा नवा व्हेरियंट ‘डेल्टाक्रॉन’ दाखल; डेल्टा आणि ओमिक्रॉन आले एकत्र मग…