Maharashtra Police Recruitment 2022 | राज्यातील 7 हजार पदांची पोलीस भरती कधी होणार ? गृहमंत्र्यांनी जाहिर केली ‘तारीख’, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police Recruitment 2022 | राज्यातील अनेक तरुण, तरुणी पोलीस भरतीची वाट पाहत असून पोलीस दलात (Maharashtra Police) भरती होण्यासाठी तरुण, तरुणी जोरदार तयारी करीत आहेत. परंतु राज्य सरकार (Maharashtra State Government) तारीख कधी जाहिर करणार आदी बाबत काहीही माहिती मिळत नव्हती. मात्र, पोलीस भरतीबाबत (Maharashtra Police Recruitment 2022) गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी मोठे विधान केले आहे.

 

राज्यामध्ये 50 हजार पोलीस पदे रिक्त (Posts Vacant) असून सध्या साडे पाच हजार मुलांची भरती पूर्ण झाली आहे. सात हजार पदांची पोलीस भरती (Maharashtra Police Recruitment 2022) काढली जाणार आहे. जूनच्या 15 तारखेपासून ही प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. यानंतर राज्य मंत्रिमंडळासमोर (State Cabinet) आणखी 15 हजार पदे भरण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाईल, असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. ही मोठी भरती करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळ नक्कीच परवानगी देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांवर खूप ताण असून तो कमी करण्यासाठी ही भरती गरजेची असल्याचे त्यांनी म्हटले.

नागरिक किंवा मुले गेम खेळण्यासाठी अनेक अ‍ॅपबेस्ड कंपन्याकडून कर्ज (Loan) काढतात. गरजेसाठी कर्ज काढले तर वेगळी गोष्ट,
मात्र, असे केल्याने फसवणुकीचे (Fraud) गुन्हे (Crime) होत आहेत. सायबर क्राईम (Cyber Crime) वाढत असल्याने पोलिसांवर ताण वाढत आहे.
यामुळे अनावश्यक गोष्टींसाठी कर्ज काढणे टाळावे. राज्य सरकार कारवाई करत आहे.
मात्र सर्वच आपल्या हातात नाही, असेही वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

 

पोलिसांच्या घरा संदर्भात बोलताना वळसे पाटील म्हणाले, पोलिसांच्या घरांसाठी दरवर्षी 800 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
काही ठिकाणी प्रकल्प हाती घेता येतील का याचे प्रयत्न सुरु आहेत.
पोलीस वसाहत किंवा स्वत:चे घर कसे मिळेल यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती त्यांनी दली.

 

Web Title :- Maharashtra Police Recruitment 2022 | Maharashtra police recruitment 2022 will start process after 15 june dilip walse patil on police bharti cyber crime and others

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा