Maharashtra Political Crisis | ‘त्यांनी साद घातली तर प्रतिसाद देणार’, ठाकरेंकडे परतण्याबाबत शिंदे गटाच्या मंत्र्याचं मोठं विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज नवनवीन घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत (NCP) बंड करुन अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह 9 आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये (Shinde Fadnavis Government) सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपसोबत (BJP) राष्ट्रवादी आल्याने शिंदे गटात (Shinde Group) नाराजी असल्याची चर्चा आहे. यातच आता शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मोठे विधान केले आहे. (Maharashtra Political Crisis)

2019 मध्ये राज्यातील मतदारांनी भाजप-शिवसेना युतीला (BJP-Shiv Sena Alliance) स्पष्ट बहुमत दिले. मात्र, त्यानंतर अशा काही घटना घडल्या की, महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस (Congress) या तीन पक्षांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) करुन सरकार स्थापन केले. (Maharashtra Political Crisis) यानंतर गेल्यावर्षी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी केली. शिंदे गटाने भाजपच्या मदितीने सरकार स्थापन केले. या सरकारला काही दिवसांपूर्वी एक वर्ष पूर्ण झाले. मात्र, कट्टर विरोधक असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सामील झाला आहे. त्यामुळे शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा आहे.

राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत मोठे विधान केले आहे. त्यांना विचारण्यात आले की, जर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बोलावले, तर त्यांच्याकडे परत जाणार का? यावर ते म्हणाले की, हा जर तरचा प्रश्न आहे. ज्यावेळी त्यांच्याकडून हाक येईल तेव्हा साद दिली जाईल. त्यांच्याकडून तशी साद आली तर आम्ही देखील सकारात्मक प्रतिसाद आम्ही देऊ. जर तुम्हाला कोणी साद घातली की आपण एकदम धुडकाऊन लावत नाही. याबाबत विचार करणारा मी एकटा नाही. पक्षाचे नेते मंडळी, वरिष्ठ मंडळी आहेत, असे शंभुराज देसाई यांनी म्हटले. त्यांच्या वक्तव्यामुळे आगामी काळात आणखी एक राजकीय भूकंप होणार का अशी चर्चा रंगली आहे.

Web Title :   Maharashtra Political Crisis if uddhav thackeray calls us we will respond shambhuraj desais big statement about returning to thackeray group

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik NCP News | नाशिकमध्ये संघर्ष पेटला, भूजबळ-अजित पवार-शरद पवार समर्थक आमने-सामने; पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यावरुन राडा

Ajit Pawar | ‘म्हणून मी सरकारमध्ये आलो…’, कॅबिनेटनंतर अजित पवारांच्या विधानाची चर्चा

Actor Ajay Devgn | अभिनेता अजय देवगनची मुंबईमध्ये प्राईम लोकेशनला मोठी गुंतवणूक; किंमत ऐकून व्हाल धक्क

Actress Janhvi Kapoor | अभिनेत्री जान्हवी कपूर पापाराझींसमोर करत होती अंग झाकण्याचा प्रयत्न; फोटो व्हायरल

Maharashtra Politics News | बहुमत असताना राष्ट्रावादीला सत्तेत का घेतलं? शिवसेना नेत्याने सांगितले कारण

Actress Ameesha Patel | बॉलीवुडच्या एका निर्मात्यासोबतच्या अफेअरने बर्बाद केले अमिषा पटेलचे पूर्ण करिअर; आता होतोय पश्चाताप

Actress Rekha | अभिनेत्री रेखा यांनी 10 वर्षे का स्विकारली नाही कोणत्याही चित्रपटाची ऑफर? रेखाजींनी दिले उत्तर

Maharashtra Cabinet Decision | राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर, महाराष्ट्र ठरले पहिले राज्य; अजित पवार उपमुख्यमंत्री होताच पहिली कॅबिनेट बैठक, घेतले 8 महत्त्वाचे निर्णय