Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी मुंबईत केंद्राने पाठवले सीआरपीएफचे तब्बल 2 हजार जवान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | राज्यातील राजकारणात हालचालींना वेग आला आहे. बंडखोरीनंतर अडचणीत सापडलेल्या महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. या बहुमत चाचणीला बंडखोर आमदारांना (Rebel MLA) सुद्धा उपस्थित रहावे लागणार असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्राने तब्बल 2 हजार सीआरपीएफचे (CRPF) जवान मुंबईत पाठवले आहेत. बंडखोर आमदार (Maharashtra Political Crisis) उद्या गोव्याहून मुंबईत दाखल होणार आहेत.

 

सीआरपीएफचे 2 हजार जवान तीन विशेष विमानांनी मुंबईत दाखल झाले आहेत. शिवसेनेच्या (Shivsena) बंडखोर आमदाराविरोधात शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण असून यापूर्वी अनेक ठिकाणी तोडफोड निषेधाच्या घटना घडल्या आहेत. बंडखोर आमदार मुंबईत दाखल झाल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा (Law and Order) प्रश्न उपस्थित होऊ शकतो, या शक्यतेमुळे मुंबईत तब्बल 2 हजार जवान पाठवण्यात आले आहेत. (Maharashtra Political Crisis)

 

दुसरीकडे महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) सुद्धा काटेकोर बंदोबस्त सर्वत्र ठेवला आहे. बंडखोर आमदारांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तत्पूर्वी बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे.

 

उद्या 30 जून रोजी बहुमत चाचणी होणार आहे. यासाठी बंडखोर आमदार सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
त्यांना सीआरपीएफ जवानांच्या बंदोबस्तात बसने विधानभवनपर्यंत नेण्यात येईल.
कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी काळजी घेतली जाणार आहे.
दरम्यान, भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.
कोणतीही प्रक्षोभक वक्तव्य करून नये आणि कोणतीही बॅनरबाजी करू नये, असे या नोटीशीत म्हटले आहे.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | security of rebel mlas to be enhanced 2000 crpf personnel deployed in mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | ही तुमची शेवटची कॅबिनेट होती का ? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले…

 

CM Uddhav Thackeray | ‘मला माझ्याच लोकांनी दगा दिला, सहकार्याबद्दल धन्यवाद’; CM उद्धव ठाकरेंनी मानले आभार

 

Shivsena | एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांकडून शरद पवारांविरुद्ध तुफान फटकेबाजी