Maharashtra Political News | मंत्री दादा भुसे-आदित्य ठाकरेंची खरंच गुप्त भेट झाली?, भेटीच्या चर्चांवर दोन्ही नेत्यांचे स्पष्टीकरण

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | शिंदे गटाचे मंत्री (Shinde Group) दादा भुसे (Dada Bhuse) आणि ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची गुप्त भेट (Secret Meeting) झाल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले होते. या वृत्तामुळे राज्याच्या राजकारणात (Maharashtra Political News) चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या दोन्ही नेत्यांनी गुप्त भेटीच्या वृत्तांचे खंडन केलं आहे. दरम्यान, आपण आदित्य ठाकरें यांची भेट घेतली नाही हे सांगण्यासाठी दादा भुसे माध्यमांसमोर थेट नातींना घेऊन समोर आले.

आमची भेट झालेली नाही – दादा भुसे

आपल्या नातीच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने नाशिकला आलो असल्याचे दादा भुसे यांनी माध्यमांना सांगितले. ते आपल्या दोन्ही नातींना कडेवर घेऊन माध्यमांसमोर भूमिका मांडण्यासाठी आले होते. आदित्य ठाकरे यांच्या भेटीचा विषयच नाही. माझी विनंती आहे की, एक छोटीसी कल्पोकल्पित बातमीसुद्धा चुकीची दिशा देते. दुपारी बारा वाजल्यापासून चार वाजेपर्य़ंत आपल्यासोबत आहे. त्यानंतर मी इथे आलो. यापलिकडे आणखी काय सांगणार असं दादा भुसे म्हणाले. (Maharashtra Political News)

छुप्या भेटीची गरज नाही – आदित्य ठाकरे

आदित्या ठाकरे हे देखील शनिवारी नाशिक दौऱ्यावर आले आहेत.
यावेळी दादा भुसे यांच्या सोबत झालेल्या गुप्त बैठकीबाबत विचारले असता ते म्हणाले, नाही, ते खरंच तिथे होते? आपण सगळे तिथे होता. अशी छुपी भेट नाही किंवा हुडी घालून मी कुणाला भेटायला जात नाही. मुख्य गोष्ट ही होती की, अनेक दिवसांपासून मला त्या रिसॉर्टला भेट द्यायची इच्छा होती. इथल्याच व्यक्तीने ते रिसॉर्ट बनवलं आहे. मला ते बघायचं होतं

मी पर्यटन मंत्री (Tourism Minister) होतो, तेव्हापासून या रिसॉर्ट बद्दल ऐकत होतो.
आज येथे येण्याची संधी मिळाली. मागे मी एका लग्नासाठी येथे आलो होतो.
या रिसॉर्टमध्ये पर्यावरण आणि पर्यटन एकत्र केलं आहे, म्हणून मी ते बघायला गेलो.
छुप्या भेटींची गरज नाही. जे आहेत जगजाहीर असतं. कुणाला दरवाजे बंद ठेवायचे की उघडे ठेवायचे,
हे उद्धव साहेब (Uddhav Thackeray) ठरवतील, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cough Problem | सर्दीत औषध घेणे किती योग्य किंवा किती दिवसानंतर उपचार करावा सुरू?

Prostate Cancer च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतात 43 टक्के पुरुष, तुम्ही करू नका ‘ही’ चूक

Constipation | मॅग्नेशियम बद्धकोष्ठता दूर करण्यात परिणामकारक उपाय आहे का? एक्‍सपर्टकडून जाणून घ्या

Diabetes – Mental Disease | ‘या’ मानसिक आजाराला बळी पडतो प्रत्येक दुसरा डायबिटीज रूग्ण,
लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी