Maharashtra Politics | ठाकरे गटाने सादर केलेली प्रतिज्ञापत्र बोगस असल्याचा शिंदे गटाचा आरोप, मुंबई गुन्हे शाखेची पथक चार जिल्ह्यात दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | शिवसेनेच्या (Shivsena) समर्थनार्थ निवडणूक आयोगाला (Election Commission) दिलेली सुमारे साडेचार हजार शपथपत्रे बोगस (Bogus Affidavits) असल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. तसेच मुंबईत या प्रकरणी गुन्हा देखील (FIR) दाखल झाला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेने (Crime Branch) तपास सुरु केला असून गुन्हे शाखेची चार पथके कोल्हापूर (Kolhapur), पालघर (Palghar), अहमदनगर (Ahmednagar) आणि नाशिक (Nashik) येथे (Maharashtra Politics) तपासासाठी पोहचली आहेत.

 

शिवसेना आणि शिंदे गटातील (Shinde Group) धनुष्यबाण पक्षचिन्हाचा (Dhanushyaban Symbol) वाद निवडणूक आयोगासमोर आहे. यासाठी आयोगाने प्रतिज्ञापत्रे दाखल करण्यास सांगितले आहे. त्यानुसार दोन्ही गटांकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची प्रतिज्ञापत्रे दाखल केली जात आहेत. काही दिवसांपूर्वी वांद्रे येथे जवळपास 4600 च्या आसपास बनावट प्रतिज्ञापत्र तयार केली जात असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी मुंबईत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही प्रतित्रापत्रे शिवसेनेसाठी (Maharashtra Politics) तयार केली जात असल्याचा दावा शिंदे गटाने केला. नोटरी करणारी व्यक्तीच प्रतिज्ञापत्र भरून देत असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे.

या बनावट प्रतिज्ञापत्राचा तपास मुंबई पोलिसांच्या गु्न्हे अन्वेशषण विभागाने सुरू केला आहे.
मुंबई क्राईम ब्रांचची चार पथके कोल्हापूर, पालघर, अहमदनगर, नाशिकला पोहचली असून
पोलीस अधीक्षक कार्यालयातून उद्यापासून तपास सुरू करण्यात येणार आहे.
शिवसेनेच्या नावाने पालघर जिल्ह्यातून 140 प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली आहेत.
या प्रतिज्ञापत्रांचा तपास करण्यासाठी मुंबई क्राईम ब्रँचची टीम पालघर मध्ये पोहोचली आहे.
यासाठी पालघर पोलीसांची मदत घेतली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

 

Web Title :- Maharashtra Politics | mumbai police crime branch team reaching
in four district regarding bogus affidavit in shivsena case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा