मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राज्यातील आगामी निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा देखील समावेश आहे. बुधवारी शिवसेनेच्या खासदारांची (Shivsena MP) बैठक वर्षा बंगल्यावर घेण्यात आली होती. या बैठकीत (Maharashtra Politics News) खासदारांच्या कामांचा आढावा तसेच मतदारसंघातील परिस्थिवर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर शिंदे गटाचे (Shinde group) खासदार कृपाल तुमाने (MP Krupal Tumane) यांनी मोठा खळबळजनक दावा केला आहे.
खासदार तुमाने म्हणाले, आगामी काळात लवकरच ठाकरे गटातील (Thackeray Group) खासदार, आमदार शिवसेनेत (Shivsena MLA) प्रवेश करताना दिसतील. कालसुद्धा बैठकीवेळी एक खासदार उपस्थित होते. ते बैठकीत नव्हते मात्र बाहेर बसले होते. ते देखील येतील. जे काही खासदार उतरलेत त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त काढायचा आहे. खासदार, आमदार, पदाधिकारी सर्वांची इच्छा प्रवेशाची आहे ते लवकरच येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुढील वर्षी लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election) होणार आहे.
त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलवली होती.
खासदारांच्या समस्या जाणून घेतल्या, संघटनात्मक बांधणीवर चर्चा झाली.
सर्वांनी निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करावे. युतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवणार आहोत.
प्रचाराची तयारी कशी करायची यावरही चर्चा झाली असल्याचे खासदार कृपाल तुमाने यांनी सांगितले.
Web Title : Maharashtra Politics News | 1 mp of thackeray group present at the meeting in varsha bungalow shivsena leader claims
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Maharashtra Politics News | ‘गद्दारांची गाडी चालवण्याची वेळ फडणवीसांवर आली’, ठाकरे गटाचा खोचक टोला
- New Parliament Building | ‘त्या’ घटनांचा उल्लेख करत फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल, म्हणाले- ‘हे सगळे खुर्चीचे सौदागर, मोदींचा…’
- Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : खडकी पोलिस स्टेशन – बनावट नंबरप्लेट रिक्षाला लावून फिरणार्या चालकाला अटक