Maharashtra Politics News | महाविकास आघाडीत मोठी घडामोड, उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये वेगवगळ्या मुद्यावरून मतभेद असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सहकारी पक्षांना विचारात न घेता राजीनामा दिल्याचे विधान केले आहे. या सर्व घडामोडींवर (Maharashtra Politics News) महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) मंगळवारी रात्री मोठी घडामोड होत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Party) प्रमुख उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर (Silver Oak) गेले आहेत.

 

अदानी प्रकरणामध्ये जेपीसीची (JPC) गरज नसल्याचं विधान शरद पवार यांनी केलं, पण काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेनं जेपीसीची मागणी लाऊन धरली आहे. तसंच सावरकरांच्या मुद्यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्यानंतर शरद पवारांनी राहुल गांधींसमोरच विरोधकांच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. तसंच उद्धव ठाकरेंनीही या मुद्यांवरुन काँग्रेसला इशारा दिला होता.

ईव्हीएमच्या (EVM) मुद्यावरुन उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसने टीका केली, पण अजित पवारांनी मात्र ईव्हीएमला दोष देऊ नका, अशी भूमिका मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदीं (PM Narendra Modi) यांच्या डीग्रीवरुन सुरु असलेल्या वादातही राष्ट्रवादीची भूमिका वेगळी राहिली. 2014 साली नागरिकांनी मोदींना त्यांची डिग्री बघून मतं दिली नाहीत, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले होते.

 

या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत.
या नेत्यांसोबत संजय राऊत (Sanjay Raut) हे सुद्धा उपस्थित आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट ही पूर्वनियोजित असल्याचे सांगण्यात येत आहे.
काल संजय राऊत यांनी शरद पवार यांची वाय.बी. चव्हाण सेंटर येथे घेट घेतली होती.
त्यानंतर आज उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहे.

 

Web Title :- Maharashtra Politics News | Big development in Mahavikas Aghadi, Uddhav Thackeray meets Sharad Pawar at Silver Oak

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics News | बाबरी शिवसैनिकांनीच पाडली, शिवसेनेच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं

PM Kisan | १४व्या हप्त्याची मोठी अपडेट! या महिन्यात येऊ शकतात पैसे, तयार ठेवा हे डॉक्‍यूमेंट

Maharashtra Politics News | भगवान गडावर राजकीय वाद, पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यात खडाजंगी