Maharashtra Politics News | ‘अजितदादांना सिंचन घोटाळ्यातून क्लीन चीट नाही’, भाजप आमदाराचे मोठं विधान

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | आम्ही कोणताही पक्ष फोडलेला नाही, तेच इकडे आले आहेत. अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपमध्ये (BJP) आले नाहीत. त्यांच्या पक्षाने सरकारला पाठिंबा दिला आहे. सिंचन घोटाळ्यातून (Irrigation Scam) अजित पवार यांना कोणतीही क्लीन चीट देण्यात (Maharashtra Politics News) आली नाही. त्यासंदर्भात चौकशी सुरु असल्याचे भाजप सचिव, विधानसभा आमदार श्रीकांत भारतीय (MLA Shrikant Bhartiya) यांनी सांगितलं. ते पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

श्रीकांत भारतीय पुढे म्हणाले, अजित पवार सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय हा राज्यातील साडेबारा कोटी जनतेच्या हितासाठीच घेतला आहे. शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन करण्यामागे सर्वसामान्य माणसाचे हित हेच ध्येय होते. निर्णय हा सामान्य माणसाच्या हिताचा असेल तर तो निर्णय जनता स्वीकारते. अजित पवार यांनी जनतेच्या हितासाठी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तसेच नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हेच देशाचे पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजे, असं दुसऱ्या एखाद्या पक्षाला वाटावे हे खूप महत्त्वाचं ठरतं. (Maharashtra Politics News)

सरकारने 2014 ते 2019 या पाच वर्षात केलेल्या कामागिरीवर जनतेने निवडणुकीत भाजपला कौल दिला आहे. 2019 ला सत्तेत आलेले सरकार हे न्याय तत्वाचे सरकार नव्हते. त्यामुळे जनतेच्या मनातील सरकार यावे यासाठी प्रयत्न झाले, असे श्रीकांत भारतीय म्हणाले.

Web Title :  Maharashtra Politics News | bjp secretary mla shrikant bharatiya statement goes viral about ajit pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Rohit Pawar | ‘कोणता पक्ष? कोणता विचार? अन् कसली निष्ठा?’ रोहित पवारांचे खोचक ट्विट; ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाले ‘ज्या पिढीला आम्ही डोक्यावर मिरवली…’

Actress Shraddha Kapoor | अभिनेत्री श्रद्धा कपूर पडली आहे प्रेमात; बॉलीवुडच्या ‘या’ व्यक्तीसोबत अफेअरच्या चर्चा

Pune Crime News | कमी किंमतीचे हिरे जास्त किंमतीला देवून 3 कोटी 48 लाखांची फसवणूक ! तनिष्क शोरूममधील सेल्समनला अटक; मॅनेजर, कॅशिअर, बिझनेस मॅनेजर आणि शोरूमच्या मालकाविरूध्द गुन्हा

Chhagan Bhujbal | ‘साहेबांनी मला बोलवलं तर मीपण…’, छगन भुजबळांचं मोठं विधान

Pune Crime News | ‘आयुष’च्या प्रवेश परीक्षेच्या क्लासच्या नावाखाली महिलेशी अश्लिल वर्तन; शिक्षकावर गुन्हा दाखल

Actress Kriti Sanon | अभिनेत्री क्रिती सेनॉन अभिनयाबरोबरच करणार ‘या’ क्षेत्रात काम

Ajit Pawar | तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? अजित पवारांचा शरद पवारांना थेट सवाल