Maharashtra Politics News | अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावर ठाकरे गटाचा पलटवार, म्हणाले-‘डीएनए टेस्ट करावी…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) जागावाटपाचा फॉर्म्युला ठरायचा आहे. परंतु त्याआधीच आम्ही मोठा भाऊ आहोत असं राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं आहे. त्यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा होत असताना काँग्रेस (Congress) आणि ठाकरे गटाने (Thackeray Group) अजित पवारांवर पलटवार (Maharashtra Politics News) केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी अजित पवारांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे. आज ते माध्यमांशी बोलत होते.

 

डीएनए टेस्ट करावी लागेल

अजित पवार यांनी केलेल्या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, सगळ्यांची डीएनए टेस्ट (DNA Test) करु आम्ही एकदा. हा विनोद समजून घ्या. लहान भाऊ, मोठा भाऊ हा विषय मधल्या काळात शिवसेना-भाजप युतीमध्ये (Shiv Sena-BJP Alliance) देखील होता. तेव्हाही मी म्हणालो होतो की डीएनए टेस्ट करावी लागेल. मविआत असे मतभेद नाहीत. अजित दादा काय म्हणतात? आम्ही काय म्हणतो? याही पेक्षा प्रत्येकजण आपापल्या पक्षाची भूमिका मांडत असतो.

 

आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी अशी भूमिका घ्यावी लागते. लोकसभेच्या जागा वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. आधी लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election) होईल, मग विधानसभेची (Legislative Assembly Election) होईल. लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात प्रमुख पक्षांच्या बैठका सुरु आहेत. या बैठकीत काय ठरतंय ते मी तुम्हाला बाहेर सांगणार नसल्याचे संजय राऊत म्हणाले.

 

कोणी गर्व करावा हा…

अजित पवार यांच्या विधानावर माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची आमची परंपरा आहे. कोणी गर्व करावा हा त्यांचा अधिकार आहे, त्यावर प्रतिक्रिया देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी मोघम प्रतिक्रिया पटोले यांनी दिली.

 

काय म्हणाले अजित पवार?

जागा वाटप करताना आपल्याला लहान भाऊ म्हणून भूमिका घ्यावी लागत होती. मात्र आता आपण काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत.
कारण त्यांच्या 44 आणि आपल्या 54 जागा आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे 56 आमदार होते.
हे गणित आहे, असे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.

 

 

Web Title :  Maharashtra Politics News | nationalist is the big brother in mahavikas aghadi
rautas reply to ajit pawars statement said all dna test

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा